Spice Industry Success Story: पारंपरिक मसाल्यांचा तयार झाला ब्रॅण्ड

Women Enterpreneurship: हडपसर येथील प्रियांका शिंदे यांनी पारंपरिक मसाल्यांचा सुगंध दरवळणारा 'शिंदेशाही फूड्स' हा ब्रॅण्ड उभा करत उद्योजकतेचा आदर्श निर्माण केला आहे. कुटुंबाच्या पाठबळावर आणि सरकारी योजनांचा उपयोग करून त्यांनी मसाला उद्योगात यशस्वी भरारी घेतली आहे.
Priyanka Shinde
Priyanka ShindeAgrowon
Published on
Updated on

The brand 'Shindeshahi Foods': ‘स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्याला सत्यात उतरविण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्‍वास लागतो.’ या तत्त्वावर विश्‍वास ठेवून हडपसर (पुणे) प्रियांका सुहास शिंदे यांनी उद्योजकतेचा प्रवास सुरू केला. पारंपरिक चव आणि नैसर्गिक मसाल्यांचा ‘शिंदेशाही फूड्स आणि मसाले’ हा ब्रॅण्ड त्यांनी तयार केला आहे.

इच्छाशक्ती आणि संघर्षाच्या बळावर शून्यातून भरारी घेता येते, हे पुणे शहरातील हडपसर (ता. हवेली) जवळील तरवडे वस्ती येथील प्रियांका सुहास शिंदे यांनी दाखवून दिले आहे. तीन वर्षांपूर्वी घरगुती पातळीवर मसाला निर्मितीला त्यांनी सुरुवात केली. व्यवसाय उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबाने त्यांना प्रोत्साहन, मदत आणि मार्गदर्शन केले.

पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीच्या मसाल्यांच्या निर्मितीवर प्रियांकाताईंनी भर दिला आहे. कोणताही कृत्रिम रंग, चव किंवा संरक्षक नसलेले, घरगुती आणि पारंपरिक पद्धतीवर त्यांनी भर दिला आहे. २०२२ मध्ये त्यांनी मसाला निर्मितीसाठी यंत्रणा खरेदी केली. सुरुवातीला ग्राहकांच्या मागणीनुसार मसाले तयार करून देण्यावर त्यांनी भर दिला. ग्राहकांना मसाल्याची चव पसंत पडल्याने मागणी वाढण्यास सुरुवात झाली. याचबरोबरीने त्यांनी पीठ निर्मितीदेखील सुरू केली. पीठ निर्मिती उद्योगामध्येही त्यांनी चांगली गती घेतली.

Priyanka Shinde
Spice Industry : उच्चशिक्षित युवकाने अल्पावधीत यशस्वी केला मसाले ब्रॅण्ड

प्रक्रिया उद्योगाची उभारणी

प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीबाबत प्रियांका शिंदे म्हणाल्या, की कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबद्दल माहिती मिळाली. या योजनेअंतर्गत मी प्रक्रिया उद्योगाबाबत विशेष प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत उद्योग उभारणीसाठी बँकेमध्ये प्रकल्प अहवाल जमा केला. मला योजनेअंतर्गत तीन लाख १५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. त्यामुळे व्यवसाय वाढविण्यास अधिक प्रोत्साहन मिळाले.

कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मंडल कृषी अधिकारी गुलाब कडलक, कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, तेजोमय घाडगे, अनुराधा दबडे, कृषी सहायक पुष्पा जाधव यांचे सहकार्य लाभले. प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य मिळाल्याने मसाला निर्मिती उद्योग वाढविण्यासाठी विविध यंत्रांची खरेदी केली. मसाला निर्मितीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील बॅडगी, लाल तिखट मिरचीची निवड केली जाते.

Priyanka Shinde
Spices Industry : मसाले उद्योगात ‘सुजलाम्’ची भरारी

मसाले निर्मिती करताना लवंग, मिरी, दालचिनी आदी घटकांमुळे मसाल्यांना अस्सल सुगंध आणि चव येते. सध्या या प्रकल्पामध्ये गोडा मसाला, लाल मिरची पावडर, काश्मिरी मिरची पावडर, धने पावडर, लाल तिखट, जिरा पावडर, कोल्हापुरी पद्धतीचा कांदा- लसूण मसाला, काळा मसाला तसेच हळद पावडर तसेच कैरी लोणचे, लिंबू मिरची लोणचे निर्मिती केली जाते. उत्पादनांचे वेगळेपण जपण्यासाठी ‘शिंदेशाही फूड्स आणि मसाले’ असा ब्रॅण्ड तयार केला आहे.

प्रक्रिया उद्योगामध्ये कायमस्वरूपी पाच महिलांना रोजगार मिळाला आहे. गरजेनुसार ही संख्या वीसपर्यंत जाते. मसाले निर्मितीसोबत पापड, कुरडई, सांडगे, उपवासाच्या पदार्थामध्ये चकली, बटाटा वेफर्स तयार केले जातात. तसेच पारंपरिक उन्हाळी पदार्थांमध्ये बाजरीचे खारवडे, बिबड्या, ज्वारी-बाजरी पापड याचबरोबरीने दिवाळीसाठी चकली, डिंक लाडू, ड्राय फ्रूट लाडू, शेव लाडू, शंकरपाळी आणि करंजी निर्मिती केली जाते. वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे ग्राहकांकडून विविध पदार्थांची मागणी वाढली आहे. पुणे शहरातील विविध उपनगरे, सोसायटींच्या बरोबरीने आता मुंबईमध्ये मसाला तसेच विविध प्रक्रिया पदार्थांची चांगली विक्री होत आहे. पन्नास किलो विक्रीपासून सुरू झालेल्या उद्योगातून आता दर महिना सरासरी पाचशे किलो मसाल्यांची विक्री होते.

आकर्षक पॅकिंग

शहरी ग्राहकांची मागणी विचारात घेऊन प्रियांकाताईंनी पॅकिंगमध्ये बदल केले आहेत. प्रामुख्याने ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, २५० ग्रॅम व ५०० ग्रॅम व एक किलो अशा विविध प्रकारच्या स्वरूपात मसाल्याचे पॅकिंग केले जाते. मसाल्याच्या प्रकारानुसार ४५० ते ८०० रुपये किलो असे दर आहेत. खर्च वजा जाता प्रक्रिया उद्योगातून २५ ते ३० टक्के नफा शिल्लक राहतो. वाजवी दरात मसाला विक्रीचे तंत्र अवलंबल्याने ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी घरी येऊन मसाला खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. सोसायटीमधील ग्राहकांना मसाले पोहोच केले जातात. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री सुरू केली आहे.

- प्रियांका शिंदे ७२१८८३८३६८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com