Vasantdada Sugar Institute Pune : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमीत्त आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झुनुझुनवाला, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यावेळी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ग्रीन हायड्रोजनसारखे जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून, भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, आपल्या देशातील साखर उद्योग ब्राझीलवर अवलंबून असल्याने भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही. म्हणूनच साखर उद्योगाने आता साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज आहे.
देशभरातील कृषी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजनसारखे इंधन तयार करण्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. 'जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी' या विषयावरील या जागतिक परिषदेला २७ देशांमधील २ हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.
भारतीय शेती व्यवस्थेत ऊस हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. मात्र आता केवळ साखर उत्पादन वाढवून चालणार नाही. उपपदार्थांकडे वळावे लागेल. भविष्याचा वेध घेत साखर उद्योगाला वाटचाल करावे लागेल. त्यासाठी आपल्याला आधी समस्या समजावून घ्यावी लागेल. हरितक्रांतीमुळे उत्पादकता वाढली; मात्र दुर्दैवाने बाजारभाव वाढलेले नाहीत.’’ असे ते म्हणाले.
मी स्वतः शेतकरी आहे, असे अभिमानाने सांगत श्री. गडकरी म्हणाले, ‘‘विदर्भात शेती करतो. तेथे तीन साखर कारखाने आम्ही चालवतो. तेथील सामाजिक, आर्थिक परिस्थिती एक दिवस सुधारेल, अशी स्वप्ने पाहिली जात आहेत. त्यासाठी भात उत्पादक हे ऊस उत्पादनाकडे वळतील.
त्यांच्याकडे पैसा येईल व तेथील आत्महत्या थांबतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ‘व्हीएसआय’ने नागपूरमध्ये संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी मी केली होती व ती पवार साहेबांनी स्वीकारली. याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.