Ginger Farming : विक्रमी आले उत्पादनातील अमोल

Ginger Production : नगर जिल्ह्यातील नांदूर (ता. राहाता) येथील अमोल व बाबासाहेब या भदे बंधूंनी अभ्यास, कष्ट वतज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विकसित केलेली आले शेती व त्याचे व्यवस्थापन प्रेरणादायी आहे. दरवर्षी एकरी २० टनांपेक्षा कमी आपली उत्पादकता येत नसल्याचे ते अभिमानाने सांगतात.
Ginger Farming
Ginger FarmingAgrowon
Published on
Updated on

Success Story of Ginger Farming : नगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातील नांदूर येथील बाळासाहेब भदे कुटुंबाची सुमारे दहा एकर शेती आहे. त्यांचा तरुण मुलगा अमोल (वय वर्षे ३५) आपले बंधू बाबासाहेब यांच्यासोबत शेतीची पूर्णवेळ जबाबदारी सांभाळतो. अमोल यांनी सुमारे १५ एकर शेती करारावर देखील करण्यास घेतली आहे. अमोल अत्यंत अभ्यासूपणे व शिकाऊ वृत्तीने शेती व्यवस्थापन करतात.

झेंडू, सोयाबीन, भाजीपाला, साडेचार एकरांवर द्राक्षे ही पिके आहेतच. पण दहा वर्षांपासून आले हे त्यांचे मुख्य पीक आहे. कृषी ज्ञान केंद्र (केव्हीके), बाभळेश्‍वर येथील विषय विशेषज्ञ भरत दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या तांत्रिक व्यवस्थापनुसार भदे यांनी आले शेती प्रगतिशील केली आहे.

आदर्श पीक व्यवस्थापन

मागील वर्षी २५ टन, तर यंदाच्या वर्षी ३० टनांपर्यंत उत्पादन घेतल्याचा दावा अमोल यांनी केला
आहे. मागील नऊ वर्षांच्या काळात आले उत्पादनाची सरासरी एकरी २० ते २१ टनांच्या आसपास राहिल्याचे ते सांगतात. मागील वर्षी त्यांनी केलेले व्यवस्थापन प्रातिनिधीक स्वरूपात पाहूया.

दरवर्षीप्रमाणे मागील वर्षीही १५ मार्च दरम्यान बेण्यासाठी निवड केलेल्या आल्याची (वाण माहीम) पोत्याच्या बारदानाखाली सावलीमध्ये भट्टी लावणे.

वीस एप्रिलनंतर कोंब फुटण्यास सुरुवात. मेच्या पहिल्या आठवड्यात लागवडीचे नियोजन.

त्यापूर्वी दोन वेळा नांगरणी, एक वेळा कल्टिव्हेटर, त्यानंतर रोटाव्हेटर वापरून मशागत.

त्या वेळेस एकरी आठ ट्रॅक्टर कुजलेल्या शेणखताचा वापर. त्यानंतर सारा यंत्राच्या साह्याने साडेचार फूट अंतरावर गादीवाफे (बेड) तयार केले.

Ginger Farming
Ginger Food Processing : आल्यापासून पावडर, कॅण्डी, ज्यूस

लागवड करण्यापूर्वी तीन दिवस आधी दररोज सरासरी ४ ते ५ तास ठिबकद्वारे बेड चांगले भिजवून घेतले. त्यानंतर एकरी २ बॅग १०:२६:२६ खताचा वापर.

बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या बेणे प्रक्रियेनंतर ठिबकच्या दोन्ही बाजूंनी एक बाय अर्धा फूट अंतरावर हलक्या जमिनीत आले लागवड. बेणेप्रक्रियेमुळे कंदकूज किंवा मर यासारख्या रोगांना झाला प्रतिबंध.

लागवडीनंतर ७ ते ८ दिवसांनी पॉवर टिलरच्या साह्याने हलकी माती लावून सूक्ष्म अन्नद्रव्ये मातीआड केली. त्यानंतर ठिबकमधून जिवाणू खतांचा वापर. यात प्राधान्याने मायकोरायझाचा वापर.

सोबतच सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा यांचा जमिनीतून वापर. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये सल्फर, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांचा गरजेनुसार वापर.

लागवडीनंतर १८ ते २० दिवसांनी तणनाशकाचा वापर.

लागवडीनंतर ३० दिवसांनी पॉवर टिलरद्वारे पहिला भुजवटा. त्यासाठी घरच्याच पॉवर टिलरच वापर.
त्यामुळे कंदांची फुगवण मोठ्या प्रमाणात होते असा अमोल यांचा अनुभव. त्यांनी भुजवटा यंत्र
बनवून घेतले आहे अन्य शेतकरीही आपल्या शेतासाठी त्याचा वापर करतात.

पिकात ७० व्या दिवशी दुसरा व ९० व्या दिवशी तिसरा भुजवटा देतात. प्रत्येक भुजवट्यावेळी रासायनिक खतांची मात्रा.

विद्राव्य खतांचाही वापर. यात लागवडीपासून २० दिवस ते ५० दिवस १९:१९:१९ (५ किलो प्रति
एकर दर ५ दिवसांनी). ५० ते ८० दिवसांपर्यंत १२:६१:०० (५ किलो प्रति एकर दर ५ दिवसांनी) आणि ८० ते १२० दिवसांच्या दरम्यान ००:५२:३४ (५ किलो प्रति एकर दर ५ दिवसांनी).

Ginger Farming
Ginger Cultivation : बेण्याचे भाव वाढल्यामुळे आले लागवड घटणार?

शेण, गोमूत्र स्लरीचाही वापर. घरच्या दोन देशी गायी.

एकूणच अन्नद्रव्ये व्यवस्थापनात सेंद्रिय, रासायनिक, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय स्लरी, जिवाणू खते आणि विद्राव्य खते यांचा संतुलित वापर.

एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन. अळी, रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू नये
यासाठी बिव्हेरिया, मेटॅरायझियम, व्हर्टिसिलियम लेकॅनी आदी जैविक कीडनाशके तसेच कामगंध सापळ्यांचा वापर. सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी पॅसिलोमायसिस या जैविक घटकाचा वापर.

बेण्याच्या खर्चासह एकरी अडीच लाख रुपये उत्पादन खर्च.

विक्री व्यवस्था

भदे बंधूंनी उत्पादनाच्या गुणवत्तेवर सतत भर दिल्याने श्रीरामपूर येथील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. या भागात आल्याची किलोवर खरेदी होते. मागील दोन- तीन वर्षांत किलोला ८५. ९० रुपयांपासून ते कमाल १२७ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. बेणेविक्रीसाठीही परिसरातील आले उत्पादकांकडून दरवर्षी मागणी असते.

कुटुंबातील सर्वांचा सहभाग

अमोल यांना आई अलका, वडील बाळासाहेब, पत्नी शीतल तसेच बंधू बाबासाहेब व त्यांची पत्नी
अनिता यांची शेतीत समर्थ साथ मिळते. प्रत्येक जण आपल्याला ठरवून दिलेले काम मेहनतीने पूर्ण करतो. त्यामुळेच कुटुंबाने शेतीतून प्रगती केली आहे.

कसबे डिग्रज, जि. सांगली येथील आले, हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांचेही मार्गदर्शन अमोल यांना लाभते. केंद्रातील प्रशिक्षणाचाही लाभही त्यामुळे अमोल यांना झाला आहे. केंद्राद्वारे आद्यरेखा प्रात्यक्षिकही त्यांच्या शेतावर झाले आहे.

अमोल यांच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी

राज्यभरातील आले उत्पादकांशी समन्वय. त्यांच्या शेतांना भेटी. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

सातत्याने नवे तंत्र जाणून घेण्याची व शेतीत बदल करण्याची सवय.
अनावश्‍यक वेळ वाया न घालवता शेतीलाच अधिकाधिक वेळ.


संपर्क : अमोल भदे, ९९२२९८७००१
भरत दवंगे, ९९२३६५४५४५
(विषय विशेषज्ञ, केव्हीके, बाभळेश्‍वर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com