Team Agrowon
जिल्ह्यात आले लागवडीसाठी बियाणे खरेदी सुरू झाली आहे. सध्या आले बियाण्यास प्रतिगाडीस (५०० किलो) ४८ ते ५० हजार रुपयांपर्यंत दर निघाला आहे.
यंदाचे दर गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. यामुळे आले पीक क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर, सातारा जिल्ह्यांत सर्वाधिक आले पिकाची लागवड होते. आगामी आले लागवडीच्या दृष्टीने निरोगी बियाणे शोध व खरेदी काम सुरू झाले आहे.
बियाण्याच्या खरेदीच्या तोंडावर असतानाच धुणीच्या आल्याच्या दरात सुधारणा होत असल्याने बियाण्याचे दरातही सुधारणा होत आहे.
आले बियाणे शेतकरी एकमेकांकडून खरेदी होत असल्याने यामध्ये व्यापाऱ्यांचा संबंध कमी असतो.
गतवर्षी आल्याच्या बियाण्याचे दर २५ हजार ते ३५ हजारांपर्यंत गेले होते. तसेच धुणीच्या आल्यास विक्रमी म्हणजे ७० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
बियाण्यास दिलेल्या आल्यास दुपटीने धुणीच्या आल्यास दर मिळाल्याने या हंगामात आले बियाण्यास देण्यास शेतकरी इच्छुक दिसत नाही.