Goat Farming: परदेशी नोकरी सोडून कोकणात आफ्रिकन बोअर शेळी संगोपन

नोकरी सोडून रीतसऱ प्रशिक्षण, अभ्यास, सुरुवातीचे नुकसान, अडचणी याद्वारे शेळीपालनाला यशस्वी पुढे नेताना आफ्रिकन बोअर शेळीसंगोपनात ते रमले आहेत. उत्तम व्यवस्थापन, ‘सोशल मीडिया’चा ‘मार्केटिंग’साठी प्रभावी वापर व्यवसायाची उलाढाल ८० लाखांपर्यंत नेली आहे.
Goat Rearing
Goat RearingAgrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याचा पूर्वपट्टा भातासाठी ओळखला जातो. तालुक्यातील भिरवंडे हे सह्याद्रीच्या पायथ्याशी फोंडा-कनेडी मार्गावर वसलेले गाव आहे.

या भागातील शेतकरी अलीकडील वर्षांत काजू लागवडीकडे वळले आहेत. चढ-उताराची इथली जमीन काजूसाठी (Cashew) पोषक मानली जाते. गावातील नरामवाडी येथे नीलेश नाना सावंत यांची शेती आहे.

गावची ओढ

सावंत यांचे बालपण, शिक्षण मुंबईत (Mumbai) झाले. ‘इलेक्ट्रिक इजिंनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशात पाच, सहा वर्षे नोकरी केली. सुमारे १६ वर्षे युरोप, चीन, दुबई, आखाती व आफ्रिकी देशांत‘प्रोजेक्ट मॅनेजर’ म्हणून अनुभव घेतला.

मात्र कोकणातील आपलं गाव, शेती, तिथलं वातावरण यांची ओढ कायम होती. तेथेच शेतीपूरक व्यवसाय थाटावा असे वाटायचे. अखेर नोकरी सोडून ते गावी परतले. त्यात शेळीपालन (Goat Farming) हा उत्तम पर्याय असल्याचे जाणवले.

व्यवसायाचे ‘होमवर्क’

सावंत यांनी व्यवसायातील प्रक्षिक्षण, शेळीपालकांकडे भेटी व काही ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यावर भर दिला.

पुणे, पंढरपूर, बारामती, सावंतवाडी आदी २५ हून अधिक ठिकाणी त्या निमित्ताने त्यांनी भेटी दिल्या. संगोपन व्यवस्थापनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतचे बारकावे माहीत करून घेतले. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची चर्चा केली.

व्यवसायाची सुरुवात

सावंत यांची गावात वडिलोपार्जित जमीन होती. घरापासून पाचशे ते सहाशे मीटर अंतरावरची जागा ‘गोट फार्म’साठी (Goat Farming) निवडली. बंदिस्त प्रकारच्या शेडची रचना केली.

देशी, उस्मानाबादी, सोजत, सिरोही, बीटल या जातींच्या शेळ्या (Boar Goat) आणल्या. पण काही शेळ्यांना येथील वातावरणाचा मोठा फटका बसला. शेडमध्ये पोहोचेपर्यंत काही शेळ्यांना तापासह विविध आजारांनी ग्रासले. तीसपैकी १० शेळ्या दगावल्या.

Goat Rearing
Animal Care : शेतकरी नियोजन गाय-म्हैस पालन

सुरुवातीलाच हा फटका बसल्याने सावंत नाराज झाले खरे, पण ते डगमगले नाहीत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी व्यवस्थापन सुधारले. मात्र सर्वांत महत्त्वाचा पर्याय पुढे आला तो आफ्रिकन बोअर जातीच्या शेळीसंगोपनाचा.

ही शेळी ३० ते ४५-४८ अंश सेल्सियस तापमानातही जुळवून घेते असे समजले. सन २०१९ च्या अखेरीस अन्य शेळ्यांना पूर्णविराम देत बोअर जातीच्या चार शेळ्या खरेदी केल्या.

बोअर शेळीचे संगोपन

१) सुरुवातीला बँक ऑफ इंडियाकडून तीन लाखांचे कर्ज व स्वगुंतवणूक करून ६० बाय ४० फुटाचे शेड उभारले.

२) लहान-मोठ्या मिळून शेडमध्ये ८४ शेळ्या. ‘नाद’ असे ‘गोट फार्म’चे नामकरण.

३) पिलांसाठी दोन, गाभण शेळ्यांसाठी १०, अन्य शेळ्यांसाठी तीन आणि बोकडांसाठी दोन
अशी शेडची १७ भागांत विभागणी.

४) प्रत्येक शेळीला खाद्य, पाणी सहज मिळेल अशी शेडची रचना.

५) सावंत सांगतात की कोकणात सर्वांत अडचण येते ती येथील जमिनीत विविध चारापिके उत्पदित होण्याची. मात्र हिरव्या चाऱ्यासाठी संकरित नेपियर, सुबाभूळ यांची लागवड.

६) गरजेनुसार मुरघास विकत घेऊन त्याची साठवणूक.

७) वर्षातून एकदा पीपीआर व अन्य रोगांसाठी लसीकरण. तीन महिन्यांतून एकदा निजर्तुंकीकरण, यात वेगवेगळ्या जंतनाशकांचा वापर. गाभण शेळ्यांच्या दैनंदिन खुराकावर अधिक लक्ष.

बाजारपेठ व विक्री

शेळ्यांच्या विक्रीसाठी फेसबूक, व्हॉट्‌सॲप आदी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. त्यातून सिंधुदुर्ग, रायगड आदींसह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा आदी जिल्ह्यांपर्यंत ग्राहक तयार केले. ओडिशा, आसाम, चेन्नई, मध्य प्रदेश, बिहार आदी परराज्यांतील ग्राहकही मिळवले.

पिढीनिहाय पिल्ले, शेळ्या व बोकड यांच्या विक्रीतून प्रति नग ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत दर मिळतो. वर्षभरात बोकडाचे वजन १०० ते १२०, कमाल २०० किलोपर्यंत, तर शेळीचे वजन ६० ते ७० किलोपर्यंत होते.

Goat Rearing
शेळी पालन व्यवसायाला मिळणार चालना; राज्य सरकार राबवणार समूह शेळी योजना 

वर्षाला तीन ते चार टन लेंडीची किलोला १५ रुपयांप्रमाणे विक्री होते. कोकणातील आंबा उत्पादक डंपरमधून हे खत घेऊन जातात.

सस २०१९-२० मध्ये वार्षिक १० लाख रुपये, २०२०-२१ मध्ये ३० लाख, तर सन २०२१-२२ ८० लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे.

दहा लाखांचे शेड, चार लाखांचे प्राणी

सुरुवातीला दहा लाखांचे शेड उभारले. त्यातील शेळ्यांसाठी गुंतवणूक चार लाख रुपयांपर्यंत होती. सर्व प्रकिया पूर्ण झाल्यानंतर हे व्यावहारिक नसल्याचे लक्षात आले.

शेडची किंमत जनावरांच्या किमतीपेक्षा कमी असायला हवी असे त्यांना जाणवले. आता सावंत अन्य शेतकऱ्यांना ही बाब पटवून देतात.

प्रचार आणि प्रसार

जिल्ह्यात बोअर शेळीपालन फायदेशीर ठरत असल्याने सावंत या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करतात. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकरीही त्यांच्या ‘गोटफार्म’ला भेटी देतात. त्यांच्याकडून ज्यांनी शेळ्या खरेदी केल्या त्यांच्याकडे जाऊन व्यवस्थापन टिप्स ते देतात.

आपले ज्या गोष्टींमुळे नुकसान झाले तसे अन्य शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये असा प्रयत्न असतो. राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनीही सावंत यांच्या प्रकल्पाला भेट दिली आहे.

नीलेश सावंत-९०८२७९९२४७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com