Cotton Update : कपाशी वाण विकासात आयुष्य वेचणारी महिला शास्त्रज्ञ : डॉ. सुमन सिंग

Cotton Farming : मूळ वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील डॉ. सुमन बाला सिंग यांचे सर्व शिक्षण जबलपूर (मध्य प्रदेश) येथून झाले. त्यानंतर त्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नागपूर येथील केंद्रीय कपाशी संशोधन संस्थेमध्ये पैदासकार म्हणून रुजू झाल्या.
Cotton Update
Cotton UpdateAgrowon
Published on
Updated on

Cotton Cultivation : मूळ वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील डॉ. सुमन बाला सिंग यांचे सर्व शिक्षण जबलपूर (मध्य प्रदेश) येथून झाले. त्यानंतर त्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नागपूर येथील केंद्रीय कपाशी संशोधन संस्थेमध्ये पैदासकार म्हणून रुजू झाल्या.

त्या वेळी त्यांना पहिल्या महिला शास्त्रज्ञ असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. कोरडवाहू आणि त्यातही महिला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण काम केले पाहिजे, याची प्रकर्षाने जाणीव झाली.

संशोधनाला मिळाली दिशा

पहिल्याच प्रकल्पामध्ये पैदासकार म्हणून त्यांनी दुष्काळाला सहनशील अशा वाणांची निर्मिती केली. मात्र त्या वेळी संस्थेला या वाणांच्या वेगळ्या चाचण्या घेण्याची सुविधा नसल्यामुळे उत्तम असून, हे वाण प्रसारित होऊ शकले नाहीत.

मात्र पुढे २०११ मध्ये त्यातील एक वंशावळ (लाइन) CNH 301 ही तिच्या वैशिष्ट्यपूर्ण दुष्काळ सहनशीलतेच्या गुणधर्मासाठी नवी दिल्ली येथील बियाणे नोंदणीकरण संस्थेमध्ये (NBPGR) INGR 11061 या क्रमांकाने नोंदली गेली.

संकरीकरणाला सुरुवात...

कपाशीमध्ये संकरीकरणाचे तंत्राच्या वापराला सुरुवात १९७० पासूनच पहिल्या एच ४ या संकरित वाणाच्या प्रसारणाने झाली होती.

Cotton Update
Cotton Market : सेलू बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल ६००० ते ७२८० रुपये

१९८९ मध्ये आयसीएआर ने काही विशिष्ट पिकांमध्ये संकरीकरण संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन म्हणून एक मोठा प्रकल्प सुरू केला. त्यात नऊ पिकांसोबत कपाशीचाही समावेश असलेला प्रकल्प देशभरातील १३ संशोधन केंद्रावर कार्यरत झाला. त्यातून काही संकरित वाणांचा विकास शक्य झाला.

पारंपरिक संकरित बियाणेही महाग असल्याने त्यांचा प्रसार एकूण क्षेत्राच्या केवळ ४५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला होता. या बियाण्यांची किंमत करण्यासाठी १९९७ मध्ये जागतिक बॅंकेच्या सहकार्याने कपाशी संकरित वाणांचा विकास हा प्रकल्प राबवला गेला. तो नर वंध्यत्व असलेल्या संकरीकरणावर आधारित प्रकल्प होता.

कोणत्याही पैदास कार्यक्रमाची यशस्विता ही प्रामुख्याने त्या पिकाच्या जैवविविधता आणि जनुकीय पायाभूत गुणधर्मांवर अवलंबून असते. त्या वेळपर्यंत नर वंध्यत्व असलेल्या केवळ परदेशी जाती उपलब्ध होत्या.

मात्र त्या रसशोषक किडींसाठी फारच संवेदनशील होत्या. मग त्यांचे रूपांतर सीएमएस (cytoplasmic genetic male sterility) आणि जीएमएस (Genetic male sterility) करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सीएमएसच्या Gossypium harknessii and G. aridum या दोन स्रोतांमधून १५७ सीएमएस आणि २० जीएमएस लाइन्स विकसित करण्यात यश आले.

ही जनुकीय विविधता एकूणच संकरीकरण प्रकल्पासाठी पायाभूत ठरली. त्यातून दोन लाइन्स LRA5166 GMS आणि ABGMS (CSNH) यांची नोंदणी नवी दिल्ली येथील NBPGR कार्यालयात करण्यात आली.

बीटी वाण

२००२ मध्ये भारतात व्यावसायिक लागवडीसाठी बीटी कपाशी संकरित बियाण्यांचे आगमन झाले. त्यामुळे संशोधनाचे प्राधान्यक्रम बदलले. दीर्घकाळ शेतात असलेल्या कापूस पिकावर अमेरिकन बोंड अळी (Helicoverpa armigera), गुलाबी बोंड अळी (Pectinophora gossypiella) आणि ठिपक्यांची बोंड अळी (Earias vittella आणि Earias insulana) या तीन प्रकारच्या बोंड अळ्या येत.

त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होत असे. ते टाळण्यासाठी भारतातील एकूण कीडनाशक वापराच्या सुमारे ४५ टक्के कीडनाशके फक्त कपाशी संरक्षणासाठी वापरली जात. त्यावर उपाय म्हणून जमिनीतून मिळविलेल्या बॅसिलस थुरिन्जिएन्सिसचे (Bacillus thuringiensis) जनुकीय गुणधर्म कपाशी वाणात आणण्यात आले.

त्यातून विकसित बोलगार्ड (cry1Ac gene-Mon531 event) २००२ मध्ये, तर बोलगार्ड २ (cry1Ac+cry2Ab genes-Mon15985 event) बाजारात आणले गेले. यामुळे बोंड अळ्यामुळे होणारे कपाशीचे नुकसान रोखले जाऊन उत्पादनामध्ये ३० टक्क्यांनी वाढ शक्य झाली.

फवारण्याचे प्रमाण ४६ टक्क्यांवरून घसरून २० टक्क्यांपेक्षा कमी झाले. उत्पादित कापसाचा दर्जा सुधारला. या तंत्रज्ञानाचा स्वीकार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक बीटी कपाशी वाण लागवड होऊ लागली. तरीही कपाशीचे जागतिक उत्पादनाच्या (हेक्टरी ७५० किलोपेक्षा) आपले उत्पादन कमी होती.

ते ५०० किलो प्रति हेक्टरवर स्थिर झाले होते. त्यामागील कारणांमध्ये ६५ टक्के कापूस हा कोरडवाहू पद्धतीमध्ये घेतला जात असल्याचे पुढे आले. पिकाच्या संवेदनशील काळामध्ये पाण्याचा ताण पडल्यामुळे उत्पादन कमी मिळत होते.

त्यातच कोरडवाहू शेतकऱ्यांच्या दृष्टीने बीटी कपाशी वाणांच्या बियाण्यांचा खर्च आवाक्याबाहेर जात होता. पुन्हा हे बियाणे पुनर्लागवडीसाठी दुसऱ्यांदा वापरता येत नव्हते.

Cotton Update
Cotton Cultivation : ठिबक सिंचनावर कपाशीच्या लागवडीकडे कल

या अडचणी लक्षात घेत २००५ मध्ये संस्थेने बीटी वाणांच्या विकासावर काम सुरू केले. या प्रकल्पाला पुढे टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटन या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साह्य मिळाले. या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या प्रांत आणि परिस्थितीमध्ये वाढणाऱ्या चांगल्या आणि मूळ वाणांचे प्रकार निवडण्यात आले.

सातत्यपूर्ण कामांनंतर २०१६-१७ मध्ये बीटी जातींच्या वेगवेगळ्या २१ प्रकार (जिनोटाइप) यांच्या चाचण्यास उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतातील वेगवेगळ्या १८ प्रक्षेत्रांवर घेण्यास सुरुवात झाली. त्यातून नागपूर येथील संस्थेकडून वेगवेगळ्या विभागासाठी ११ बीटी वाणांचे प्रसारण करण्यास मान्यता मिळाली.

हे प्रसारित वाण बोंड अळ्यांसाठी प्रतिकारक आणि उत्पादनासाठीही चांगले होते. त्याच वेळी पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पूर्वीच्या अन्य संकरित वाणांच्या तुलनेमध्ये रसशोषक किडींसाठीही अधिक सहनशील होते.

हे वाण गुलाबी बोंड अळीसह सर्व बोंड अळ्यांसाठी अधिक कार्यक्षम होते. त्यांचा विविध प्रक्षेत्रांवर घेतलेल्या चाचण्यांचा नफा खर्च गुणोत्तर हे २.६५ ते २.८१ इतके चांगले होते. (संदर्भ ः ICAR-AICRP Annual Report Crop Production 2019-20, pp 51-52.) हे वाण ‘गॅझेट ऑफ इंडिया’मध्ये नोंदले गेले असून, विविध खासगी बीजोत्पादन कंपन्यांसोबत सहकार्य करारांतर्गत उत्पादनाखाली आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये मोठी भर पडली आहे. या सर्व संशोधन प्रकल्पांमध्ये संस्थेच्या तत्कालीन संचालकांचे मार्गदर्शन वेळोवेळी मोलाचे ठरल्याचे डॉ. सुमन बाला सिंग सांगतात.

या वाणांच्या विकसनामध्ये मोलाचे योगदान

आयसीएआर - सीआयसीआर या संस्थेचे रजत बीटी, पीकेव्ही ०८१ बीटी, सूरज बीटी, जीजेएचव्ही ३७४ बीटी, ९ बीटी, १४ बीटी, १६ बीटी, २१ बीटी, २३ बीटी, २५ बीटी, युगांक बीटी.

अजूनही कार्य सुरूच...

नुकत्याच डॉ. सुमन या सेवानिवृत्त झाल्या असल्या तरी मॅजिक प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत. मॅजिक (MAGIC - Multiparental Advance Generation Intercross RILs) प्रकल्पामध्ये एकापेक्षा अधिक मूळ जातींपासून आधुनिक आंतरसंकरित वाणांच्या विकासासाठी काम केले जात आहे. यात पहिल्या टप्प्यात अभ्यासासाठी त्यांनी ८ मूळ जाती निवडलेल्या आहेत.

पुरस्कार

डॉ. सुमन बाला सिंग यांना ‘इंडियन सोसायटी ऑफ कॉटन इम्प्रूव्हमेंट, मुंबई’ यांचा ‘डॉ. ए. बी. जोशी यंग सायंटिस्ट ॲवॉर्ड मिळाला होता.

संपर्क - डॉ. सुमन बाला सिंग, ९४२३४००५०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com