Digital School : ‘अग्निपंख’सह शेतकऱ्यांनी उभारली पर्वतावर शाळा

Success Story : डोंगरी भागातील कष्टकरी शेतकरी व तळागाळातील समाजघटकांवर प्रेम असलेली शहरी स्वयंसेवी संस्था एकत्र आल्यानंतर किती अभिनंदनीय काम उभे राहते हे भोर तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेत बघण्यास मिळते. तेथील रायरेश्‍वर पर्वतावर उभारलेली ‘सेमी डिजिटल शाळा’ सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
Semi Digital School
Semi Digital SchoolAgrowon
Published on
Updated on

Rural Success Story : डोंगरी भागातील कष्टकरी शेतकरी व तळागाळातील समाजघटकांवर प्रेम असलेली शहरी स्वयंसेवी संस्था एकत्र आल्यानंतर किती अभिनंदनीय काम उभे राहते हे भोर तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेत बघण्यास मिळते. तेथील रायरेश्‍वर पर्वतावर उभारलेली ‘सेमी डिजिटल शाळा’ सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

भोर व वाईच्या सीमेवरील रायरेश्‍वर पर्वताला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीची शपथ घेतली होती. रायरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या पर्वतावरील शेतकरी आधीपासूनच विद्येचे भुकेले आहेत. १९५५ मध्ये पर्वतावरील जननीदेवीच्या पडवीत पहिली शाळा सुरू झाली. भिवा धोंडिबा जंगम हा सुशिक्षित शेतकरी तेथे शिक्षकाची भूमिका बजावू लागला.

विद्यार्थी बनले अधिकारी

१९६७ मध्ये तेथील अशिक्षित शेतकऱ्यांनी एकत्र येत पडवीऐवजी स्वतंत्र शाळा बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रतिघर दोन रुपये वर्गणी गोळा केली. शेतकऱ्यांनी डोक्यावर पाट्या वाहून नेत दगड, मातीत दोन खोल्या बांधत पर्वतावर शाळा सुरू केली. ‘‘शाळेच्या छताची कौले ७ किलोमीटर डोक्यावरून वाहून आणली होती’’, असे सोमनाथ जंगम यांनी सांगितले. याच दगडी शाळेतून शेतकऱ्यांची मुले शिकली.

त्यातील भिवा हा एलआयसी अधिकारी, शंकर हा बॅंक व्यवस्थापक, धोंडिबा पोलिस, तर महादेव पोलिस अधिकारी बनल्याचे शेतकरी अभिमानाने सांगतात. रायरेश्‍वरच्या मंदिरासमोरच ७५ दिवसांत नवी शाळा उभारली.

Semi Digital School
Sitaphal Orchard Success Story : कमी पाण्यातील सीताफळाचा नवले कुटुंबीयांना आधार

‘अग्निपंख’ने सव्वा दहा लाख रुपये खर्चत शाळेची उभारणी केली आहे. शाळेच्या भिंतीवर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे रंगचित्र आहे. ‘‘या शाळेतून अब्दुल कलामांसारखं महान शास्त्रज्ञ घडावा,’’ असे आमचे स्वप्न असल्याचे मुख्याध्यापक आत्माराम हांडे सांगतात.

Semi Digital School
Success Story : शेतकऱ्यांच्या समस्येवर साईप्रसाद परिवाराची फुंकर

‘अग्निपंख’ने दिली ‘उडान’

पर्वतावर होणाऱ्या तुफान पाऊस व वादळवाऱ्यात सुरू असलेल्या या शाळेला पुढे पुणे जिल्हा परिषदेने पाठिंबा दिला. तेथे शिक्षकांची व्यवस्था केली. तसेच इमारत भाडेदेखील देणे सुरू केले होते. मात्र ७-८ वर्षांपूर्वीच जुनी शाळा पडली आणि पाड्यावरील सारी मुले सभामंडपात बसून शिकत होती. ज्ञानार्जनाची ही अनोखी कहाणी गेल्या वर्षी श्रीगोंद्याच्या अग्निपंख फाउंडेशनला समजली. त्यानंतर ‘अग्निपंख’चे अध्यक्ष बाळासाहेब काकडे व शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रमदानातून अत्याधुनिक शाळा उभारण्याचा निर्धार केला.

बाळासाहेब काकडे, ९४२३७५४७३५ अध्यक्ष, अग्निपंख

इतिहास पुरुषांच्या उत्सवांवर, सोहळ्यांवर अनाठायी खर्च करण्यापेक्षा दऱ्याडोंगरातील विद्यार्थी शिकावा, यासाठी आम्ही रायरेश्‍वर पर्वतावर शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी साथ दिल्यामुळे सेमी डिजिटल शाळा उभी राहू शकली.
गणेश डोईफोडे, उपाध्यक्ष, अग्निपंख फाउंडेशन
नवी शाळा बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी वाळू, सिमेंट, लोखंड, खडी, विटा स्वतः वाहून आणल्या. येथे शिक्षक व ‘अग्निपंख’चे कार्यकर्तेही राबले. मात्र आम्हा शेतकऱ्यांना श्रमदानापोटी एक लाख रुपयांचा मेहनताना देत ‘अग्निपंख’ने आश्‍चर्याचा धक्का दिला.
सोमनाथ जंगम, शेतकरी, रायरेश्‍वर
सेमी डिजिटल शाळेत एलईडी टीव्ही, सौरऊर्जा सुविधा, शैक्षणिक फ्लेक्स, क्रीडांगण, ग्रंथालय, चप्पल स्टॅंड, टी पॉइंट युनिट, बाके, आरसा-कंगवा, नेलकटर अशी साधने आहेत. - सावता जगताप, उपशिक्षक,
सावता जगताप, उपशिक्षक, रायरेश्‍वर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com