

केंद्र सरकार पंजाब, हरियाणातील रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामातील भातपिकाची (Paddy Procurement) हमीभावानं (Minimum Support Price)खरेदी करतं मग तेलंगणातील (Telangana) भातपिकाची खरेदी करायला नकार का दिला जातोय? असा खडा सवाल तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrshekhar Rao) यांनी केंद्राकडे उपस्थित केलाय.
केंद्र सरकारनं भातपिकासाठी (Paddy) हमीभाव (Minimum Support Price) जाहीर केलाय. त्यामुळे राज्यातल्या दोन्ही हंगामातल्या भातपिकाच्या हमीभावान (Minimum Support Price) खरेदीची जबाबदारी केंद्राचीच आहे. या भातपिकापासून (Paddy) तांदूळ काढायचा का परबॉइल्ड राईस करायचा हा केंद्राच्या मर्जीचा सवाल आहे. त्यात तेलंगणाला का ओढलं जात आहे ? अस राव यांनी म्हटलं आहे.
राज्याकडून भातपिकाची (Paddy) हमीभावानं (Minimum Support Price) खरेदी हे केंद्राचं कर्तव्य आहे. मिलिंग करत बसणं हा राज्य सरकारचा उद्योग नाही. केंद्रानं भातपिकाला (Paddy)हमीभाव (Minimum Support Price) जाहीर केलाय, तांदळाला नाही. त्यामुळे खरेदी केलेल्या भातपिकाचं (Paddy) काय करायचं हे केंद्रानं बघावं, तेलंगणाला त्यात स्वारस्य असण्याचं कारण नाही.
जर केंद्र सरकार आमच्या विनंतीचा विचार करत नसेल तर आम्हाला तेलंगणा निर्मितीच्या मागणीसाठी केली होती, तशी प्राणांतिक निदर्शने करायला लागतील, असा इशाराही राव यांनी दिला आहे.
व्हिडीओ पहा-
दरम्यान राज्यातल्या भातपिकाच्या (Paddy Procurement)खरेदीची मागणी करण्यासाठी राव दिल्लीत रवाना होणार होते. मात्र राव यांनी त्यांची दिल्ली भेट तूर्तास स्थगित केली असून त्यांच्याऐवजी दिल्लीत पक्षाचे शिष्टमंडळ रवाना केले आहे. या शिष्टमंडळास मिळणाऱ्या प्रतिसादांनंतर के. चंद्रशेखर राव (K.Chandrshekhar Rao) पंतप्रधान मोदी (Narenadra Modi) यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांना भेटून भातपिकाच्या खरेदीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.
एकसमान खरेदी धोरण जाहीर करा
के.चंद्रशेखर राव (K.Chandrshekhar Rao) यांनी यापूर्वीही केंद्राच्या खरेदी धोरणावर टीका करताना एकसमान खरेदी धोरण राबवण्याचा आग्रह धरलेला आहे. गुजरातसाठी वेगळं, पंजाबसाठी वेगळं असं खरेदी धोरण राबवलं जात आहे, हे संघराज्य पद्धतीसाठी अन केंद्र- राज्य संबंधांसाठीही घातक ठरणार धोरण आहे. त्यापेक्षा केंद्रानं एकसमान खरेदी धोरण राबवायला हवं, असा आग्रह राव यांनी धरलाय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.