Rain Alert
Rain AlertAgrowon

Rain Alert Maharashtra : राज्यात वादळी पावसाचा इशारा

Weather Update : उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Published on

Pune News : कमाल तापमानातील वाढ, असह्य चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण होत आहे. आज (ता. ४) राज्यात पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून मध्य प्रदेश, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली असतानाच, गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली असून, गडचिरोली येथे ६२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Rain Alert
Weekly Weather: राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

‎‎रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎‎अकोलासह ‎‎‎धुळे, ‎चंद्रपूर, ‎यवतमाळ आणि ‎वाशीम येथे ४३ अंशांपेक्षा अधिक, तसेच ‎जळगाव, ‎मालेगाव, ‎सोलापूर, ‎धाराशिव, ‎परभणी, ‎ब्रह्मपुरी आणि ‎वर्धा येथे ४२ अंशापेक्षा अधिक, तर ‎जेऊर, ‎गडचिरोली आणि ‎नागपूर येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

Rain Alert
Vidarbha Weather: पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा

‎‎आज (ता. ५) राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎रविवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३८.२---२३.१

‎‎धुळे---४३.४---१८.४

‎जळगाव---४२.८---२५.३

‎जेऊर---४१.०---२१.०

‎कोल्हापूर---३७.०---२३.५

‎महाबळेश्वर---३२.३---१७.६

‎मालेगाव---४२.२---२५.४

‎नाशिक---३७.३---२०.६

‎निफाड---३९.०---१४.७

‎सांगली---३८.७---२३.६

‎सातारा---३९.२---२४.०

‎सोलापूर---४२.५---२५.६

‎सांताक्रूझ---३४.७---२७.३

डहाणू---३७.०---२५.८

‎रत्नागिरी---३४.०---२५.५

‎छत्रपती संभाजीनगर---४०.४---२४.५

‎धाराशिव---४२.०---२२.७

‎परभणी---४२.४---२५.२

‎परभणी (कृषी)---४२.५---२३.६

‎अकोला---४४.३---२७.०

‎‎भंडारा---३७.०---२२.०

बुलडाणा---४०.०---२४.३

‎ब्रह्मपुरी---४२.६---२१.१

‎चंद्रपूर---४३.४---निरंक

‎गडचिरोली---४१.४---२३.०

‎गोंदिया---३९.१---१९.८

‎नागपूर---४१.६---२२.६

‎वर्धा---४२.०---२३.५

‎वाशीम---४३.०---निरंक

‎यवतमाळ---४३.४---२५.०

‎सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---१९.८---४४.३

‎मराठवाडा---२२.७---४२.५

‎पश्‍चिम महाराष्ट्र---१७.६---४२.५

‎उत्तर महाराष्ट्र---१४.७---४३.४

‎कोकण---२४.५---३७.०

वादळी पावसाची शक्यता ( ऑरेंज अलर्ट) :

चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाची शक्यता ( येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com