
Pune News: राज्याच्या कमाल तापमान वाढल्यामुळे उन्हाचा चटका असह्य होत आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ३) पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित विदर्भ आणि नाशिकमध्ये वादळी पावसाच्या अंदाजामुळे सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
ईशान्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. पंजाबपासून राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे देशातील उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ टिकून आहे.
शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने जळगाव आणि सोलापूर येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, धुळे येथे ४३ अंशांपेक्षा अधिक, तसेच जेऊर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आणि वाशीम येथे ४२ अंशापेक्षा अधिक, तर पुणे, सांगली, सातारा, परभणी, चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.
आज (ता. ३) राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित विदर्भासह नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
शुक्रवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---४१.२---२१.५
धुळे---४३.२---२५.६
जळगाव---४४.२---निरंक
जेऊर---४२.५---२३.५
कोल्हापूर---३८.५---२३.९
महाबळेश्वर---३३.१---२१.५
मालेगाव---४२.२---२५.४
नाशिक---४०.०---२२.४
निफाड---४०.८---१८.४
सांगली---४१.०---२४.४
सातारा---४१.२---२४.१
सोलापूर---४४.१---३०.०
सांताक्रूझ---३३.९---२४.९
अलिबाग---३५.७---निरंक
डहाणू---३६.७---२४.५
रत्नागिरी---३३.५---२६.१
छत्रपती संभाजीनगर---४२.०---२८.६
धाराशिव---४२.४---२२.६
परभणी---४१.६---२७.०
परभणी (कृषी)---४१.९---२४.०
अकोला---४४.५---२८.२
अमरावती---४२.८---२४.७
भंडारा---३९.०---२१.०
बुलडाणा---४०.८---२७.५
ब्रह्मपुरी---४२.२---२१.५
चंद्रपूर---४१.८---निरंक
गडचिरोली---४०.०---२४.४
गोंदिया---३७.९---१९.८
नागपूर---४१.६---२३.४
वर्धा---४२.१---२४.५
वाशीम---४२.६---निरंक
यवतमाळ---४१.६---२६.०
सरासरी तापमान (अंश से.)
विभाग---किमान---कमाल
विदर्भ---१९.८---४४.५
मराठवाडा---२४.०---४२.४
पश्चिम महाराष्ट्र---२१.५---४४.१
उत्तर महाराष्ट्र---१८.४---४४.२
कोकण---२४.५---३६.७
४३ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :
अकोला ४४.५, जळगाव ४४.२, सोलापूर ४४.१, धुळे ४३.२.
वादळी पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) :
यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा.
वादळी पावसाची शक्यता ( येलो अलर्ट) :
नाशिक, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, गोंदिया, गडचिरोली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.