
Agriculture Advice: महाराष्ट्रावर आज (ता.४) पासून शनिवार (ता. १०) पर्यंत हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. हिंदी महासागरावर व अरबी समुद्रावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे वारे कमी दाबाचे क्षेत्राचे दिशेने वाहतील. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया, मध्य विदर्भातील वर्धा व नागपूर तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात वारे नैर्ऋत्य दिशेने वाहण्यास सुरुवात होत आहे.
त्याचाच परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील.
मॉन्सून वाऱ्यांसाठी हवेचे दाब अनुकूल बनत आहेत. त्यामुळे मे महिन्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता अधूनमधून निर्माण होईल. या आठवड्यापासून तापमान घट होण्यास सुरुवात होईल. वातावरणात बदल जाणवतील. बुलडाणा, अकोला, गोंदिया, अमरावती, नागपूर, भंडारा अहिल्यानगर, बीड, धुळे या जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहील. त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहील.
अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेग अधिक राहील. त्यातूनच ढग निर्मिती होऊन पावसाची शक्यता निर्माण होईल. तसेच प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान इक्वॅडोरजवळ २६ अंश सेल्सिअस, तर पेरूजवळ १६ अंश सेल्सिअस राहील. ते पावसासाठी अनुकूल ठरेल.
कोकण
कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ७२ ते ७८ टक्के, तर ठाणे जिल्ह्यात ५० ते ५३ टक्के राहील. मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ताशी १ ते ४ कि.मी. राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
धुळे व नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत आज ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान धुळे व नाशिक जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ५६ ते ५९, तर नाशिक जिल्ह्यात ६९ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात ८७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक व धुळे जिल्ह्यांत २४ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात ३४ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ११ ते २३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान नांदेड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस, तर बीड जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. तर बीड व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २५ ते ३० टक्के, तर नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ४४ ते ४८ टक्के राहील. मात्र धाराशिव व लातूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ११ ते २० टक्के इतकी कमी राहील. तसेच धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १६ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
आज बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान
सर्वच जिल्ह्यांत २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष
आर्द्रता २० ते ३५ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० ते ३५ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २५ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ
आज यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४ ते १० मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १८ किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात वायव्येकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
आज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ६ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ६५ टक्के, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ७० ते ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४० ते ४२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ताशी १२ ते १४ किमी, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ताशी १८ ते २० किमी राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज सोलापूर जिल्ह्यात ४ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस, तर सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. फक्त सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः किंवा काही काळ अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८१ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७० टक्के, तर सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात ६० टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १६ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.
कृषी सल्ला
पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेला शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
उन्हाळी पिकांमध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने सिंचनाचे नियोजन करावे.
जमिनीची पूर्वमशागत करताना नांगराची पाळी द्यावी.
फळबागांमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी झाडांभोवती सेंद्रिय पदार्थांचे किमान १० सेंमी थराचे आच्छादन करावे.
कोंबड्यांचे शारीरिक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेडमध्ये पंखे, फॉगर्स, पडदे आणि निवाऱ्यातील तापमान नियंत्रित करणारी उपकरणे लावावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.