Monsoon 2023 : बुधवारपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस वाढणार ?

Latest Rain Forecast : राज्याच्या काही भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
Cloud
CloudAgrowon
Published on: 
Updated on: 

Maharashtra Weather Forecast : राज्याच्या काही भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आज आणि उद्याही राज्यात जोरदार पावसाची अपेक्षा नाही. पण बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पावसाने जवळपास एक महिन्याचा खंड दिला. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पण आज राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. आज काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या पण जोरदार पाऊस नव्हता.

Cloud
Monsoon alert : कोकणात जोरदार पावसाची शक्यता

उद्या पुणे, सातारा, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये ठिकठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Cloud
Vidarbha Monsoon Update : विदर्भात पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप कायम

पण बुधवारपासून राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर सांगली आणि सातारा, तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.