Monsoon alert : कोकणात जोरदार पावसाची शक्यता

Imd rainfall alert : आज (ता. २७) कोकण तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on: 
Updated on: 

Weather report today : राज्याच्या अनेक भागांत पावसाची दडी कायम आहे. तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात श्रावण सरी हजेरी लावत आहेत. आज (ता. २७) कोकण तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Rain Alert
Kolhapur Drought Condition : दुष्काळाची भिती! अडीच महिन्यात फक्त ३५ दिवस पाऊस

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे आहे. सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व टोक शहाजहानपूर, मुझफ्फरपूर, पूर्णिया, बंकुरा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य बांगलादेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरी

राज्यात ढगाळ हवामान होत असून, उकाडा जाणवू लागला आहे. ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २७) कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. तर उर्वरित कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.