
Pune News: अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे. आज (ता. २४) रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने, तसेच लातूर, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाने तडाखा सुरूच आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये उच्चांकी २८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्वमोसमीच्या पावसामुळे आणि ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश तापमानाची नोंद झाली.
आज (ता. २४) रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने, तसेच लातूर, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आणि उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. २३) कोणतीही प्रगती केली नाही. वाटचाल पोषक हवामान असल्याने उद्यापर्यंत (ता. २५) केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यातच पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकणच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, उत्तरेकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. या प्रणालीपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, उत्तर तेलंगण ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :
कोकण : गुहागर २८०, वाकवली, संगमेश्वर, लांजा प्रत्येकी १६०, कुडाळ, कणकवली, दापोली, रत्नागिरी, देवगड, चिपळूण प्रत्येकी ११०, वैभववाडी ९०. खेड ८०, पोलादपूर, राजापूर प्रत्येकी ७०, मालवण ६०, रामेश्वर ५०.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर १००, वाई ८०, सातारा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा प्रत्येकी ७०, खंडाळा-बावडा ५०, गडहिंग्लज, इंदापूर, वेल्हे, बार्शी प्रत्येकी ४०, कोकरूड, शाहूवाडी, कोल्हापूर, पाडेगाव, शिराळा, पौड, जेऊर प्रत्येकी ३०.
मराठवाडा : औसा, देवणी प्रत्येकी ९०, लातूर, रेणापूर प्रत्येकी ८०, शिरूर अनंतपाळ ७०, उदगीर ६०, धाराशिव, लोहारा, जळकोट, उदगीर प्रत्येकी ५०, मुखेड ४०, अंबाजोगाई, वाशी, चाकूर प्रत्येकी ३०.
विदर्भ : भामरागड ५०, कोरपणा, अहेरी प्रत्येकी ४०, चंद्रपूर, एटापल्ली प्रत्येकी ३०.
शुक्रवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---२९.६---२२.८
अहिल्यानगर---३१.१---२२.५
धुळे---३४.०---२३.५
जळगाव---निरंक---२३.०
जेऊर---३१.०---२०.५
कोल्हापूर---२५.२---२२.२
महाबळेश्वर---२०.०---१८.०
मालेगाव---३५.४---२२.२
नाशिक---२९.२---२३.३
निफाड---२९.२---२३.३
सांगली---२६.६---२२.२
सातारा---२५.६---२२.०
सोलापूर---३२.७---२३.६
सांताक्रूझ---३३.४---२६.२
डहाणू---३५.१---२७.६
रत्नागिरी---२९.५---२५.२
छत्रपती संभाजीनगर---३१.२---२४.२
धाराशिव---३१.१---२१.६
परभणी---३२.२---२४.०
परभणी (कृषी)---२९.५---२३.४
अकोला---३२.३---२६.०
अमरावती---३१.८---२३.९
बुलडाणा---३०.२---२४.०
ब्रह्मपुरी---३२.०---२३.०
चंद्रपूर---३५.२---२३.०
गडचिरोली---३०.४---२३.६
गोंदिया---३२.०---२३.८
नागपूर---३१.५---२५.३
वर्धा---३०.०---२५.४
वाशीम---३१.४---निरंक
यवतमाळ---२८.६---२४.०
मुसळधार पावसाचा इशारा. (ऑरेंज अलर्ट)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे.
जोरदार वादळी पावसाचा इशारा. (ऑरेंज अलर्ट)
लातूर, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ.
विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे :
गुहागर २८०, वाकवली १६०, संगमेश्वर १६०, लांजा १६०, दापोली ११०, रत्नागिरी ११०, चिपळूण ११० (जि. रत्नागिरी), मुळदे १२०, कुडाळ ११०, कणकवली ११०, देवगड ११० (जि. सिंधुदुर्ग), महाबळेश्वर १०० (जि. सातारा).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.