
Pune News : राज्यात पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी सुरूच आहे. यातच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. आज (ता. २३) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाने तडाखा सुरूच आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. गुरुवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश तापमानाची, तर नागपूर येथे ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमानाचा पारा चाळिशीच्या खाली घसरला आहे.
आज (ता. २३) कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढणार
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. २२) कोणतीही प्रगती केली नाही. मात्र प्रगतीस पोषक हवामान असल्याने येत्या दोन दिवसांत केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यातच पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण, गोव्याच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, उत्तरेकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. या प्रणालीपासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
गुरुवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :
कोकण : कुडाळ, मुलदे (कृषी), रोहा प्रत्येकी ९०, सावंतवाडी ७०, लांजा, खेड प्रत्येकी ६०, रत्नागिरी, पनवेल, देवगड, तळा, मुरबाड प्रत्येकी ५०.
मध्य महाराष्ट्र : एनडीए (पुणे) ११०, सातारा ९०, कसबेडग्रज ६०, कोकरूड, शाहूवाडी, माळशिरस, प्रत्येकी ५०, पुरंदर, हातकणंगले, सोलापूर पत्येकी ४०, वेल्हे, जत, सांगली, मिरज, घोडेगाव, लोणावळा, चंदगड, पौड प्रत्येकी ३०.
मराठवाडा : अहमदपूर, लातूर प्रत्येकी ७०, पाथरी, औसा प्रत्येकी ६०, सोनपेठ धाराशिव, निलंगा, गांगापूर प्रत्येकी ५०, उदगीर, आंबड, उदगीर, गांगाखेड, धारूर, लोहारा, सांभाजीनगर, रेणापूर प्रत्येकी ४०.
विदर्भ : अकोला ७०, खामगाव, कामठी प्रत्येकी ६०, बुलडाणा ५०, हिंगणा, अमरावती, आमगाव, गोंदिया, वाशीम प्रत्येकी ४०, ब्रह्मपुरी, नागपूर, मोरगाव अर्जूनी, धानोरी प्रत्येकी ३०.
गुरुवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---३१.४---२२.६
अहिल्यानगर---३१.९---२२.५
धुळे---३६.०---२१.५
जळगाव---३३.५---२३.३
जेऊर---३३.५---२०.५
कोल्हापूर---२९.४---२२.५
महाबळेश्वर---२४.४---१८.१
मालेगाव---३५.०---२०.४
नाशिक---३२.१---२१.४
निफाड---३२.१---२१.३
सांगली---३०.०---२२.५
सातारा---२८.२---२२.४
सोलापूर---३३.४---२३.४
सांताक्रूझ---३२.३---२२.५
डहाणू---३३.९---२६.१
रत्नागिरी---२९.०---२४.६
छत्रपती संभाजीनगर---३२.२---२१.५
धाराशिव---३२.१---२१.४
परभणी---३६.२---२२.७
परभणी (कृषी)---३४.५---२२.३
अकोला---३७.३---२२.५
अमरावती---३९.२---२०.५
बुलडाणा---३४.४---२१.०
ब्रह्मपुरी---४२.०---२२.५
चंद्रपूर---३८.२---२३.०
गडचिरोली---३९.४---२३.२
गोंदिया---३९.८---२१.८
नागपूर---४१.२---२३.६
वर्धा---३९.५---२३.०
वाशीम---३५.२---निरंक
यवतमाळ---३८.०---२३.०
मुसळधार पावसाचा इशारा. (रेड अलर्ट)
रायगड, रत्नागिरी.
जोरदार वादळी पावसाचा इशारा. (ऑरेंज अलर्ट)
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर.
वादळी पावसाचा शक्यता. (येलो अलर्ट)
नंदूरबार, धुळे, जळगाव, सांगली, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
७० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे :
एनडीए ११० (जि. पुणे), सातारा ९० (जि. सातारा), कुडाळ ९०, मुलदे ९०, सावतंवाडी ७० (जि. सिंधुदुर्ग), रोहा ९० (जि. रायगड), अहमदपूर, लातूर ७० (जि. लातूर), अकोला ७० (जि. अकोला).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.