Weekly Weather: मॉन्सून अंदमान व निकोबार बेटांवर दाखल

Early Monsoon: या वर्षी मॉन्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली असून १३ मे रोजीच अंदमान-निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. परिणामी महाराष्ट्रातही लवकर पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on

Weather Update: भारतीय हवामान शास्त्र विभागाने मॉन्सून मंगळवारी (ता. १३) अंदमान व निकोबार बेटांवर येथे दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. अंदमान निकोबार बेटावर मॉन्सून पोहोचण्याची सर्वसाधारण तारीख ही २० मे असून या वर्षी तो ८ दिवस आधीच पोहोचला आहे. तसेच केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख १ जून आहे. गोव्यात ५ जून आणि मुंबईमध्ये सर्वसाधारण १० जूनपर्यंत मॉन्सून दाखल होतो. मात्र या वर्षी केरळात २७ मेपर्यंत, गोव्यामध्ये १ जूनपर्यंत, तर महाराष्ट्रात मुंबई येथे ५ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व विदर्भात १० जूनपर्यंत मॉन्सून पोहचणे शक्य आहे. त्यानुसार शेतीकामांची आखणी करणे गरजेचे आहे.

मॉन्सून या वर्षी अंदमान व निकोबार बेटांवर ८ दिवस आधी म्हणजेच वेळेपूर्वी येण्याचे कारणही तसेच आहे. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यातूनच ढग निर्मितीस चालना मिळाली आहे. तसेच प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरू जवळ १७ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २७ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे या भागात हवेचे दाब अधिक आहेत. इकडचे वारे त्या भागात जाऊ शकत नाहीत.

त्यामुळे हिंदी महासागरावरील ढग वाहून आणणारे वारे भारताच्या दिशेने ढग वाहून आणत आहेत. त्यात महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज (ता.१८) १००६ हेप्टापास्कल, तर उद्यापासून शनिवारपर्यंत (ता. १९ ते २४) महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तर हिंदी महासागरावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वारे मोठ्या प्रमाणात ढग वाहून आणतील. त्यामुळे आठवडाभर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता निर्माण होईल. जेथे हवेचे दाब कमी राहतील तेथे जोराचा पाऊस होतील अशी स्थिती आहे.

Monsoon Update
Pre-Monsoon Rain : पावसाचा जोर कमी, तरी भीतीचे ढग कायम

कोकण :

आज (ता.१८) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ९ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे जिल्ह्यात १२ कि. मी., तर उर्वरित सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी १ कि.मी., रायगड जिल्ह्यात ताशी २ कि.मी. आणि पालघर जिल्ह्यात ताशी ४ कि.मी. राहील. कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान पालघर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान ठाणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, पालघर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्‍ह्यांत ६५ ते ६९ टक्के, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ८१ त ८५ टक्के राहील. दुपारी सापेक्ष आर्द्रता ठाणे, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६० टक्के, तर रायगड जिल्ह्यात ७० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र :

आज (ता.१८) नाशिक जिल्ह्यात १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा बहुतांशी जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १३ कि. मी. राहील. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १७ कि. मी. राहील. कमाल तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ६७ टक्के, तर धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २५ ते २८ टक्के राहील.

Monsoon Update
Monsoon Update: दक्षिण श्रीलंकेपर्यंत मॉन्सूनची चाल; माॅन्सूनने अंदमान निकोबार बेट समूह व्यापला

मराठवाडा :

आज (ता.१८) नांदेड जिल्ह्यात ५ मि. मी., लातूर व जालना जिल्ह्यांत ६ मि. मी तसेच धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ८ मि. मी, तर बीड जिल्ह्यात १६ मि. मी. पावसाची शक्यता आहे. बहुतांशी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत राहील. धाराशिव व बीड जिल्ह्यात वाऱ्याची ताशी वेग ८ मी.मी राहील. परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० कि.मी., तर लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ताशी ११ कि. मी. आणि नांदेड जिल्ह्यात ताशी १३ कि.मी. राहील. कमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील.

परभणी व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, लातूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ६१ ते ६७ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ७२ ते ७७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ६० टक्के, लातूर व नांदेड जिल्ह्यांत ४० टक्के, तर परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५२ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ :

आज (ता.१८) बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३ मि.मी., तर वाशीम जिल्ह्यात ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत वायव्येकडून, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. अकोला व अमरावती जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाशीम, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत ताशी १४ कि.मी., तर अकोला जिल्ह्यात ताशी १८ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५२ टक्के राहील.

मध्य विदर्भ:

यवतमाळ जिल्ह्यात आज ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून, तर ताशी वेग ११ कि. मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४० ते ४४ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ५२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ :

आज (ता.१८) गडचिरोली जिल्ह्यात ६ मि. मी. व गोंदिया जिल्ह्यात ३ मि. मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. तर गडचिरोली जिल्ह्यात ती आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गोंदिया जिल्ह्यात ताशी ११ कि.मी., तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ताशी १२ कि.मी. व गडचिरोली जिल्ह्यात ताशी १४ कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ५८ टक्के, तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ६१ ते ६५ टक्के राहील. दुपारी सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ४० टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र :

कोल्हापूर, सांगली सातारा, सोलापूर, पुणे अहिल्यानगर या सर्वच जिल्ह्यांत आज ९ ते १२ मि. मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात ताशी ५ ते ६ कि.मी., तर सोलापूर व सांगली जिल्ह्यांत ताशी ७ ते ८ कि.मी. राहील. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ९ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर सांगली, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यांत ७७ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ८० ते ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७३ टक्के राहील.

कृषी सल्ला :

- आंबा फळे परिपक्व झाली असल्यास काढणी करून सुरक्षित स्थळी ठेवावीत.

- उन्हाळी भुईमूग, बाजरी, तीळ ही पिके परिपक्व झाली असल्यास त्वरित काढणी करून घ्यावी.

- काढणी केलेल्या कांद्याची प्रतवारी करून चाळीमध्ये साठवण करावी.

- पूर्वमशागतीची कामे सुरू करून जमिनी खरिपाच्या पेरणीसाठी तयार ठेवाव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com