Rain Forecast
Rain ForecastAgrowon

Maharashtra Weather: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा कायम

Rain Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Published on

Pune News: पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.

पश्चिम राजस्थानपासून मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते मन्नारचे आखातापर्यंत, तसेच मध्य प्रदेशापासून ते विदर्भ, तेलंगणापर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली पोषक ठरत असल्याने राज्याच्या विविध भागात अंशतः ढगाळ आकाशासह वादळी पाऊस हजेरी लावत आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होते आहे.

Rain Forecast
Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता

सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.४ अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे ४२.२ अंश, मालेगाव, धुळे, जेऊर, सोलापूर, यवतमाळ, वाशीम, अमरावती, गडचिरोली, नागपूर येथे ४१ अंशांपेक्षा अधिक, तर परभणी, वर्धा आणि भंडारा येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान झाल्याने, तसेच जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उन्हाचा चटका कायम आहे.

आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामान आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. १४) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.५---१८.३

अहिल्यानगर---निरंक---१८.४

धुळे---४२.२---१८.४

जळगाव---३९.०---२४.५

जेऊर---४१.०---१९.०

कोल्हापूर---३८.४---२२.९

महाबळेश्वर---३१.९---२०.०

मालेगाव---४१.८---२३.२

नाशिक---३८.१---२०.३

निफाड---३८.०---१८.०

सांगली---३८.८---२३.१

सातारा---३८.२---२०.९

सोलापूर---४१.०---२४.४

सांताक्रूझ---३३.२---२४.०

डहाणू---३५.५---२३.६

रत्नागिरी---३३.६---२४.७

छत्रपती संभाजीनगर---३९.९---२५.३

धाराशिव---३९.६---निरंक

परभणी---४०.६---२४.८

परभणी (कृषी)---३९.८---२१.२

Rain Forecast
Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस शक्य

अकोला---४२.४---२७.६

अमरावती---४१.२---२४.०

भंडारा---४०.०---२४.०

बुलडाणा---३८.२---२६.८

चंद्रपूर---४२.२---निरंक

गडचिरोली---४१.२---२२.४

गोंदिया---३८.५---२२.६

नागपूर---४१.०---२४.१

वर्धा---४०.०---२४.१

वाशीम---४१.४---निरंक

यवतमाळ---४१.५---२३.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२२.४---४२.४

मराठवाडा---२१.२---४०.६

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.३---४१.०

उत्तर महाराष्ट्र---१८.०---४१.८

कोकण---२३.६---३५.५

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

४२ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४२.४, चंद्रपूर ४२.२, धुळे ४२.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com