Weather Update
Weather UpdateAgrowon

Weather update : राज्यात वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; उद्यापासून पाऊस विश्रांती घेणार?

Rain Update : आज हवामान विभागाने राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
Published on

IMD Report : मागील आठवड्याभरापासून राज्यात पावसाचे वातावारण आहे. मागील दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरीनं हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल. आज हवामान विभागाने राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. 

Weather Update
Global Warming : जागतिक तापमान वाढ कमी करणे शेतकऱ्यांच्या हातात

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार पावसाची अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी कोरड्या हवामान राहिल. शनिवारपासून मात्र राज्यात पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

दरम्यान राज्यातील तापमानात चढ-उतार झाल्याने वातावरणातील गारवा कमी झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. रब्बीतील पिकांवर ढगाळ वातावरणामुळे किड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. परंतु शनिवारपासून राज्यात पावसाला प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com