Cold Weather Update : राज्यात गुलाबी थंडीची प्रतिक्षा

Winter Season : विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा वाढला असला तरी दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र गुलाबी थंडीची प्रतिक्षा आहे.
Cold Weather
Cold WeatherAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भ उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा वाढला असला तरी दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र गुलाबी थंडीची प्रतिक्षा आहे. यंदा डिसेंबर महिना निम्मा उलटूनही अपेक्षित थंडी अनुभवायला मिळेलेली नाही.

नैर्ऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात उन्हाचा चटका अनुभवायला मिळत असून, काही ठिकाणी ढगाळ हवामान झाल्याचे दिसून येत आहे. आज (ता. १५) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ-घट कायम राहण्याचे संकेत आहेत.

Cold Weather
Weather Forcast : सौम्य थंडी आणि सकाळी धुक्याची शक्यता

कमाल तापमानात हळूहळू घट होत असून, गुरूवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान २४ ते ३२ अंशांच्या दरम्यान होते. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

Cold Weather
Weather News : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच

गुरूवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.७ (१४.०), जळगाव २९.५ (१५.०), कोल्हापूर २९.७ (१७.५), महाबळेश्वर २६.३ (१३.५), नाशिक २८.८ (१४.२), निफाड २९.४ (१२.५), सांगली २९.६ (१७.१), सातारा ३०.२ (३०.२), सोलापूर ३२.०(१७.८), सांताक्रूझ ३२.४ (२०.५), डहाणू ३०.५ (२०.६), रत्नागिरी ३३.० (२१.५),

छत्रपती संभाजीनगर २८.० (१४.६), नांदेड २९.२ (१६.६), परभणी २८.७ (१५.५), अकोला ३१.० (१७.२), अमरावती २८.८ (१५.३), बुलढाणा २८.६ (१५.०), ब्रह्मपूरी ३१.५ (१५.१), चंद्रपूर २८.४(१३.६), गडचिरोली २८.६ (१३.६), गोंदिया २७.४ (१३.२), नागपूर २८.७(१४.४), वर्धा २८.५(१६.०), वाशीम २८.५ (१४.६), यवतमाळ ३०.७ (१६.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com