Awkali Paus : काही जिल्ह्यांना दोन दिवस गारपीटीचा इशारा; मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

Rain Forecast : आजपासून आणखी तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीचा अंदाज दिला.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News : विदर्भ आणि मराठवड्याातील काही भागात मागील तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली. हवामान विभागाने आजपासून आणखी तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज मराठवड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भातील अकोला, भंडारा, गडचिरोली, गोंदीया, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला.

Rain Forecast
Rain Forecast : विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

तर यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहू शकतात, असा अंदाज आहे. 

Rain Forecast
Weather Update : पूर्व विदर्भात आज गारपिटीचा इशारा

उद्या म्हणजेच मंगळवारी नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिलह्यात ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर नागपूर, गोंदीया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसासह काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

तसेच बुधवारी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदीया, नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com