Rain Forecast : विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. तर उन्हाचा चटका देखील कायम आहे. राज्यात पावसाचा पोषक हवामान असल्याने आज (ता. १८) विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, ते कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाचा पोषक हवामान होत असून, ढगाळ हवामान झाले आहे. शनिवारी (ता. १६) दुपारनंतर नांदेड जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्याने पिकांचे नुकसान झाले.

आज (ता. १८) पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

Rain Update
Weekly Weather : मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता

रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, ब्रह्मपुरी येथे पारा ३९ अंशांपार कायम आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने उन्हाच्या चटका, उकाडा टिकून असून आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाची ताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Rain Update
Weather Update : पूर्व विदर्भात आज गारपिटीचा इशारा

रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.४, धुळे ३६.०, कोल्हापूर ३५.९, महाबळेश्वर ३०, मालेगाव ३७.४, नाशिक ३४.२, निफाड ३३.७, सांगली ३७.१, सातारा ३५.४, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३१.९, डहाणू ३२.६, रत्नागिरी ३१.५,

छत्रपती संभाजीनगर ३६.०, नांदेड ३७.२, परभणी ३६.६, अकोला ३९.२, अमरावती ३७.४, बुलडाणा ३५.५, ब्रह्मपुरी ३९.०, चंद्रपूर ३८.०, गडचिरोली ३६.४, गोंदिया ३६.२, नागपूर ३६.५, वर्धा ३७.८, वाशीम ३८.८, यवतमाळ ३८.०.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

गोंदिया, चंद्रपूर.

वादळी पावसाचा गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com