Rain
Rain Agrowon

Awkali Paus : आजपासून ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; विदर्भातील काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता

Rain Forecast : विदर्भात आजपासून चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
Published on

Pune News : विदर्भात आजपासून चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

हवामान विभागाने आज, म्हणजेच शनिवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहू शकते.

Rain
Rain Forecast : पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा

उद्या म्हणजेच रविवारी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर यवतमाळ, गोंदीया, चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Rain
Maharashtra Rain : उद्यापासून विदर्भात पावसाचा अंदाज; चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीचाही इशारा

सोमवारी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर सोमवारी पावसासह चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये गारपीटीचीही शक्यता आहे.

मंगळवारी विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांधील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मंगळवारी मराठवड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com