Weekly Weather : मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता

Article by Dr. Ramchandra Sable : आज (ता.१७) पासून बुधवारपर्यंत (ता.२०) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. त्यानंतर गुरुवार (ता.२१) व त्यापुढील काळात महाराष्ट्रावरील हवेचे दाब आणखी कमी होऊन ते १००८ हेप्टापास्कलपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
Weather
WeatherAgrowon
Published on
Updated on

डॉ. रामचंद्र साबळे

Agriculture Weekly Weather : मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता आज (ता.१७) पासून बुधवारपर्यंत (ता.२०) महाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. त्यानंतर गुरुवार (ता.२१) व त्यापुढील काळात महाराष्ट्रावरील हवेचे दाब आणखी कमी होऊन ते १००८ हेप्टापास्कलपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल.

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील. नांदेड, हिंगोली, वाशीम या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग वाढ होऊन तो ताशी १६ कि.मी. राहील. अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. तसेच बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमानही २९ अंश सेल्सिअस राहील. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे.

त्यामुळे बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होऊन ढगनिर्मिती होण्याची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहण्यामुळे वारे मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राच्या दिशेने वाहून आणतील. मराठवाडा व विदर्भात आकाश ढगाळ राहील तर मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल.

प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान बहुतांशी भागांत २५ ते २९ अंश सेल्सिअस तर काही भागात ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे प्रशांत महासागरावर हवेचे दाब वाढतील. त्यामुळे हिंदी महासागरावरील वारे त्या दिशेने न वाहता ते दक्षिण भारताच्या दिशेने वाहतील. एकूणच ही सर्व परिस्थिती पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल बनत आहे.

त्यामुळेच यापुढील काळात ही परिस्थिती कायम राहिल्यास मार्च, एप्रिल व मे महिन्यात पूर्वमोसमी पावसासाठी हवामान अनुकूल बनण्याची शक्यता आहे. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत, तर धाराशिव, लातूर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल. त्यामुळे एकूणच पिकांची आणि जनावरांची पाण्याची गरज वाढेल.

Weather
Awkali Paus : आजपासून ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; विदर्भातील काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता

कोकण :

कमाल तापमान सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी जिल्ह्यात ७२ टक्के, तर सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांत ६५ ते ६८ टक्के व ठाणे जिल्ह्यात ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात १५ टक्के, तर पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत वायव्येकडून तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र :

कमाल तापमान धुळे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ३४ टक्के, तर धुळे जिल्ह्यात २६ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात १८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ कि.मी. राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

मराठवाडा :

धाराशिव व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दुपारी हवामान उष्ण राहील.

किमान तापमान लातूर व नांदेड जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस तर परभणी जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव व हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर बीड जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जालना जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर व नांदेड जिल्ह्यांत ३४ टक्के तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४ ते २५ टक्के राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड व हिंगोली जिल्ह्यात २१ टक्के तर परभणी व जालना जिल्ह्यांत १८ ते १९ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत २० ते २२ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ११ ते १५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत १६ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत ९ ते १४ कि. मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्चिम विदर्भ :

कमाल तापमान बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते १९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाशीम जिल्ह्यात १६ कि.मी, तर अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ९ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.

Weather
Rain Forecast : पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मध्य विदर्भ :

कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ३१ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २२ ते २३ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २६ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी ११ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ :

कमाल तापमान भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४५ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ३७ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २२ ते २४ टक्के राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४५ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३७ टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २२ ते २४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ३० टक्के, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २० ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्चिम महाराष्ट्र :

कमाल तापमान सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर सोलापूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत ४२ ते ४३ टक्के तर नगर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३१ ते ३९ टक्के राहील. सांगली जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते १३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला :

- रब्बी हरभरा, ज्वारी, गहू या पिकांची परिपक्व अवस्थेत काढणी व मळणीची कामे करावीत.

- खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जमिनीची नांगरट करून पूर्वमशागत करावी.

- शेताची बांधबंदिस्तीची कामे करावीत.

- फळबागांमध्ये ठिबक सिंचन प्रणालीद्वारे सिंचन करावे.

- फळझाडांच्या आळ्यात गवत, पालापाचोळा किंवा प्लॅस्टिक यांचे आच्छादन करावे.

- जनावरांच्या गोठ्यात वायुवीजन व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com