Rain Alert
Rain AlertAgrowon

Maharashra Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा इशारा

Rain Forecast: राज्यात विदर्भात उष्णतेचा जोर कायम असून नागपूरमध्ये कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचले. दुसरीकडे, कोकण व घाटमाथ्यावर यलो अलर्ट जारी करत हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Published on

Pune News: राज्यावरील वादळी पावसाचे सावट कायम आहे. आज (ता. १०) मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची राहण्याची शक्यता कायम आहे.

राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून गुजरात ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच मॉन्सून १३ मे पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्यास पोषक स्थिती आहे. शुक्रवारी (ता.९) राजस्थानातील जैसलमेर येथे देशातील उच्चांकी ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Rain Alert
Pre monsoon Rain: पुढील ४ दिवस वादळी पावसाचे; राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश तापमानाची नोंद झाली. ‎वर्धा, ‎ब्रह्मपुरी, ‎चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले.

‎‎‎जेऊर, धाराशिव, ‎परभणी, ‎‎भंडारा, ‎गडचिरोली आणि ‎गोंदिया येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. ‎आज (ता. १०) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, तसेच विदर्भातील वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा ( येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.‎

‎शुक्रवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३२.८---२१.७

‎‎धुळे---३१.०---१८.४

‎जळगाव---३३.९---१९.६

‎जेऊर---३७.५---२०.०

‎कोल्हापूर---३२.८---२२.५

‎महाबळेश्वर---२४.८---१६.२

Rain Alert
Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा

मालेगाव---३३.२---२१.०

‎नाशिक---३०.३---१९.८

‎निफाड---३३.२---१८.५

‎सांगली---३५.७---२२.०

‎सातारा---३२.७---२२.६

‎सोलापूर---३६.६---२५.२

‎सांताक्रूझ---३१.९---२२.५

डहाणू---३२.९---२४.०

‎रत्नागिरी---३२.५---२२.५

‎छत्रपती संभाजीनगर---३२.२---२२.६

‎धाराशिव---३७.२---२३.०

‎परभणी---३७.२---२५.०

‎परभणी (कृषी)---३६.७---२३.२

‎अकोला---३५.५---२५.७

अमरावती---३६.८---२०.७

‎‎भंडारा---३७.०---२२.०

बुलडाणा---२९.५---२२.४

‎ब्रह्मपुरी---३८.२---२७.०

‎चंद्रपूर---३८.२---२७.०

‎गडचिरोली---३७.६---२३.६

‎गोंदिया---३७.५---२३.२

‎नागपूर---३९.०---२४.४

‎वर्धा---३८.५---२५.०

‎वाशीम---३६.६---निरंक

‎यवतमाळ---३८.२---२५.०

‎सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२०.७---३९.०

‎मराठवाडा---२२.६---३७.२

‎पश्‍चिम महाराष्ट्र---१६.२---३७.५

‎उत्तर महाराष्ट्र---१८.४---३३.९

‎कोकण---२२.५---३२.९

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

३८ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎नागपूर ३९, ‎वर्धा ३८.५, ‎ब्रह्मपुरी ३८.२, ‎चंद्रपूर ३८.२, यवतमाळ ३८.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com