Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Weather Update : या आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ होत असून ‘ऑक्टोबर हीट’ जाणवण्यास सुरवात होईल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Agriculture Weather Forecast : महाराष्ट्रावर या आठवडाभर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यात अत्यंत हलक्या पावसाची शक्यता राहील. मात्र हवेचे दाब कमी होतील, त्या भागात ढग जमा होऊन अचानक मध्यम पावसाची शक्यता निर्माण होईल. आजपासून वाऱ्याच्या दिशेत बदल होत असून वारे ईशान्य दिशेकडून वाहण्यास सुरवात होईल. यालाचा ‘ईशान्य मॉन्सूनचा पाऊस’ म्हणजेच परतीचा पाऊस म्हणून ओळखले जाते. या आठवड्यात ईशान्य मॉन्सूनचा पाऊस छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, पुणे, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आज, उद्या आणि मंगळवारी (ता.६, ७, ८) होण्याची शक्यता राहील. पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. बहुतांशी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्यामुळे सूर्यप्रकाशही चांगला मिळेल. या आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ होत असून ‘ऑक्टोबर हीट’ जाणवण्यास सुरवात होईल. वाऱ्याचा ताशी वेग सर्वसाधारणच राहील.

ईशान्य मॉन्सून येत्या ५ ते ६ दिवसांत राज्यातून बाहेर पडणे शक्य आहे. प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १६ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने ‘ला-निना’चा प्रभाव कमी राहील.

कोकण

या आठवड्यात कोकणातील सर्वच जिल्ह्यांत अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत २ ते ४ मिमी, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत प्रतिदिनी १ मिमी पेक्षाही कमी राहील. मात्र पालघर जिल्ह्यात बहुतांश वेळा उघडीपीसह अत्यल्प पावसाची शक्यता राहील. थोडक्यात नैऋत्य पावसाची क्षमता अत्यंत कमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील.

Monsoon
Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा कायम

उत्तर महाराष्ट्र

धुळे व जळगाव जिल्ह्यांत काही दिवशी ५ ते ६ मिमी, तर नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत २ मिमी प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ किमी राहील. कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५६ टक्के राहील. सर्व जिल्ह्यांत ऑक्टोबर हीट जाणवण्यास सुरवात होईल.

मराठवाडा

धाराशिव जिल्ह्यात २ ते ३ मिमी, लातूर जिल्ह्यात २ मिमी, नांदेड जिल्ह्यात १ मिमी, बीड, परभणी, हिंगोली व जालना या जिल्ह्यांत १ मिमी पेक्षाही कमी पाऊस प्रतिदिन होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत काही दिवशी ६ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. एकूणच या आठवड्यात बहुतांश जिल्ह्यात अत्यल्प पावसासह उघडीप राहण्याची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात ताशी ११ किमी, तर उर्वरित लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. कमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, लातूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर नांदेड,

बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील. किमान तापमान लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील.

Monsoon
Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

पश्चिम विदर्भ

या आठवड्यात काही दिवशी बुलडाणा जिल्ह्यात ५ मिमी, अमरावती जिल्ह्यात २ मिमी, वाशीम व अकोला जिल्ह्यांत १ ते २ मिमी प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किमी राहील. कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील.

मध्य विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी १ ते २ मिमी, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १ मिमीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात वायव्येकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. ऑक्टोबर हीट जाणवण्यास सुरवात होईल.

पूर्व विदर्भ

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत काही दिवशी १ ते २ मिमी राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत काही दिवशी उघडीप, तर काही दिवशी अत्यल्प पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा भंडारा जिल्ह्यात ईशान्येकडून, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा वेग ताशी ६ ते ९ किमी राहील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

या आठवड्यात काही दिवशी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २० ते २२ मिमी, तर पुणे व सोलापूर जिल्ह्यांत ६ ते ७ मिमी पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात १ मिमी पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर जिल्ह्यात नैऋत्येकडून, तर उर्वरित सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर सांगली व पुणे जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर पुणे जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि सांगली व नगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७० टक्के राहील.

कृषी सल्ला

कापसाची वेचणी सकाळी करावी.

पावसाचा अंदाज पाहून सोयाबीनची काढणी व मळणी करावी.

रब्बी ज्वारी, हरभरा, करडईची पेरणी जमिनीत योग्य ओल असताना करावी.

उभ्या पिकातील तणांचा बंदोबस्त करावा.

जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com