Weekly Weather : बहुतांशी जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्यता

Weather Update : . हवामान अंशतः ढगाळ राहील. धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० कि.मी. पेक्षा अधिक राहील.
Weather
Weather Agrowon
Published on
Updated on

Agriculture Weather : महाराष्ट्रावर या आठवड्यात हवेचे दाब १००६ ते १००८ हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य विदर्भ अत्यल्प पावसाची शक्यता असून बराच काळ उघडीप राहील. तर पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून कोकणात मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यता आहे. गुरुवार ते शनिवार (ता.१९ ते २१) काळात महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. त्या वेळी कमाल तापमानातही वाढ होईल. दुपारी उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे सकाळी हवामान थंड राहील. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मात्र मराठवाडा, पश्‍चिम व मध्य विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. हवामान अंशतः ढगाळ राहील. धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशीम, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० कि.मी. पेक्षा अधिक राहील.

परतीच्या मॉन्सूनसाठी हवामान घटक अनुकूल बनले आहेत. राजस्थानवरील हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके असून तेथे पाऊस थांबेल. वारे ईशान्य दिशेस बाष्प वाहून नेतील. कारण ईशान्य दिशेस हवेचे दाब कमी झाले असून बिहारजवळ १००२ हेप्टापास्कल, बंगालच्या उपसागराच्या किनारी भागावरही १००२ हेप्टापास्कल इतके कमी हवेचा दाब झाले आहेत. त्यामुळे वारे वायव्येकडून ईशान्येकडे व तेथून दक्षिणेस वाहण्यास सुरुवात होईल. ईशान्य मॉन्सूनचा प्रभाव हळूवारपणे वाढत जाईल. महाराष्ट्राच्या पूर्व भागावर तापमान वाढेल व हवेचे दाब कमी होतील. आणि ईशान्य मॉन्सूनची वाटचाल सुरू होईल.

Weather
Maharashtra Rain : राज्यात पुढील तीन दिवस पावसाच्या उघडिपीची शक्यता

कोकण

आज आणि उद्या (ता.१५,१६) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते १० मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात १४ ते १६ मि.मी., रायगड जिल्ह्यात १२ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ११ ते १७ मि.मी. व पालघर जिल्ह्यात ११ ते १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ६८ टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ७४ ते ७६ टक्के राहील. नैर्ऋत्य मॉन्सूनचा जोर कमी झाला असून, अधूनमधून जोराचा पाऊस अपेक्षित आहे.

उत्तर महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.१५, १६) नाशिक जिल्ह्यात ०.१ ते ०.८ मि.मी., धुळे जिल्ह्यात ०.४ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात ०.५ ते ०.८ मि.मी., जळगाव जिल्ह्यात ०.१ ते ०.३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात १९ कि.मी., नंदुरबार जिल्ह्यात १८ कि.मी., तर जळगाव व नाशिक जिल्ह्यात १७ कि.मी. इतका राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील.

मराठवाडा

आज आणि उद्या (ता.१५, १६) लातूर जिल्ह्यात ०.१ मि.मी., नांदेड जिल्ह्यात ०.१ ते ०६ मि.मी., बीड जिल्ह्यात ०.३ मि.मी. इतक्या अत्यल्प पावसाची शक्यता राहील. धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. हिंगोली जिल्ह्यात १.४ मि.मी., जालना जिल्ह्यात ०.१ मि.मी. व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ०.३ ते ०.५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वारे ताशी २० कि.मी.पेक्षा अधिक वेगाने धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाहतील., तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १९ कि.मी. राहील. कमाल तापमान लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर धाराशिव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५५ टक्के राहील.

Weather
Maharashtra Rain Alert: पाऊस दोन दिवस विश्रांती घेणार; विदर्भात सोमवारपासून पाऊस पुन्हा सुरु होण्याची शक्यता

पश्‍चिम विदर्भ

आज आणि उद्या (ता.१५,१६) बुलडाणा जिल्ह्यात ०.१ ते ०.२ मि.मी., अकोला जिल्ह्यात ०.१ मि.मी., वाशीम जिल्ह्यात ०.१ ते २ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात ०.२ ते ०.७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाशीम जिल्ह्यात २० कि.मी., तर अमरावती व अकोला जिल्ह्यांत ताशी १८ कि.मी. व बुलडाणा जिल्ह्यात १९ कि.मी. राहील. कमाल तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ९२ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ८४ ते ८७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ८० टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज आणि उद्या (ता.१५,१६) यवतमाळ जिल्ह्यात ०.२ ते ०.६ मि.मी., वर्धा जिल्ह्यात ०.१ ते ०.४ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात २.८ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात ताशी १८ कि.मी., वर्धा जिल्ह्यात ताशी १७ कि.मी. व नागपूर जिल्ह्यात ताशी १६ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६९ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज आणि उद्या (ता.१५,१६) चंद्रपूर जिल्ह्यात ०.८ ते ३.४ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात ३ ते ५ मि.मी., भंडारा जिल्ह्यात १.४ ते ६ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात १.५ ते ८.८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर जिल्ह्यात वायव्येकडून, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७० टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.१५,१६) कोल्हापूर जिल्ह्यात १.४ ते २ मि.मी., सांगली जिल्ह्यात ०.२ ते २.१ मि.मी., सातारा जिल्ह्यात ०.४ ते १.५ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ०.३ मि.मी. व नगर जिल्ह्यात ०.१ ते ०.४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यात २३ ते २४ कि.मी., तर कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ताशी वेग १२ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान नगर व सोलापूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान पुणे जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस व सांगली जिल्ह्यात ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर पुणे व नगर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ८२ ते ८७ टक्के, तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ९० ते ९८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५० ते ७० टक्के इतकी कमी राहील.

कृषी सल्ला

सोयाबीन काढणीसाठी परिपक्व झाले असल्यास काढणी व मळणी करावी.

मूग व उडदाची काढणी करून शेंगा बडवून दाणे मोकळे करावेत.

भात खाचरात ५ ते १० सें.मी. पाणीपातळी ठेवावी.

फळबागांमध्ये तणनियंत्रण करून घ्यावे.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com