Heatwave
HeatwaveAgrowon

Heatwave Alert: मे महिन्यात उन्हाचा चटका कायम राहणार

Maharashtra Weather Forecast: तीव्र झळांमध्ये होरपळणाऱ्या महाराष्ट्राला मे महिन्यातही उन्हाचा चटका सोसावा लागणार आहे. राज्यात उष्ण लाटांचा कालावधी सरासरीपेक्षा अधिक राहण्याचे संकेत आहेत.
Published on

Pune News: तीव्र झळांमध्ये होरपळणाऱ्या महाराष्ट्राला मे महिन्यातही उन्हाचा चटका सोसावा लागणार आहे. राज्यात उष्ण लाटांचा कालावधी सरासरीपेक्षा अधिक राहण्याचे संकेत आहेत. पूर्वमोसमीच्या सरींसाठी पोषक हवामान असल्याने राज्याच्या बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊसमानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मे महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज बुधवारी (ता. ३०) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. मे महिन्यात दक्षिण भारत आणि पूर्व भारतातील काही राज्ये वगळता देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान देखील सरासरीच्या तुलनेत अधिक राहणार आहे.

Heatwave
Marathwada Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

दरम्यान, यंदाच्या मे महिन्यात उष्णतेच्या लाटा अधिक राहण्याची शक्यता आहे. राजस्थान, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकमध्ये उष्ण लाटेचे दिवस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा १ ते ३ दिवस अधिक उष्ण लाटा अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

Heatwave
Maharashtra Weather: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण हवामानाचा अंदाज

मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

मे महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक (१०९ टक्क्यांपेक्षा अधिक) पावसाचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० या काळातील आकडेवारीचा विचार करता मे महिन्यात देशात ६१.४ मिलिमीटर पाऊस पडतो. उत्तर कोकण, गुजरात राजस्थान, जम्मू- काश्मीर, ओडिशा, झारखंड, बिहार, सिक्कीम, पश्‍चिम बंगालचा हिमालयाकडील भाग, आसाम, अरुणाचल प्रदेश वगळता देशाच्या उर्वरित भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राचा विचार करता दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

‘एल-निनो’ तटस्थ पातळीवर

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या तटस्थ पातळीवर आहे. मॉन्सून हंगामातही ही तटस्थ स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल स्थिती (आयओडी) देखील तटस्थ असून, पावसाळ्यात आयओडी स्थिती टिकून राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com