Weekly Weather: कमाल, किमान तापमान वाढणार! महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढण्याचे संकेत

Maharashtra Temperature Rise: महाराष्ट्रात हवामान बदलाचे स्पष्ट संकेत आहेत. पुढील काही दिवसांत हवेच्या दाबात चढ-उतार होणार असून, त्यामुळे कमाल आणि किमान तापमान वाढणार आहे. आठवडाअखेर उष्णतेची तीव्रता जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहावे.
Summer Weather
Summer WeatherAgrowon
Published on
Updated on

Weather Forecast: महाराष्ट्रावर आज (ता.९) १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ होईल. मात्र उद्या व परवा (ता.१०, ११) हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१० हेप्टापास्कल इतके होताच कमाल व किमान तापमानात अल्पशा प्रमाणात घट होईल. बुधवारी (ता.१२) हवेचे दाब पुन्हा १००८ हेप्टापास्कल इतके कमी होताच, कमाल व किमान तापमानात वाढ झालेली असेल.

गुरुवारी आणि शुक्रवारी (ता. १३, १४) हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके राहण्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वेगाने वाढ होईल. त्यामुळे दुपारी उष्णतेच्या झळा जाणवू लागतील. शनिवार (ता. १५)पासून तापमानात झालेली वाढ कायम राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. तीव्र उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होईल. दिवसाचा कालावधी वाढलेला असेल. रात्रीही हवा उष्ण जाणवेल.

वाऱ्याचा वेग सर्वसाधारणच राहील. सुरुवातीस वाऱ्याची दिशा राज्यातील बहुतांश भागात ईशान्येकडून राहील. मात्र त्यात बदल होऊन ती काही दिवसांतच आग्नेयेकडून व पूर्वेकडून सुरू होईल. मराठवाड्यात व पश्‍चिम महाराष्ट्रात दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. हवामान उष्ण व कोरडे राहील. बहुतांशी जिल्ह्यात आठवडाअखेरीस कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. या आठवड्यात फारसे हवामान बदल जाणवणार नाहीत. मात्र हवामान ढगाळ राहणे शक्य आहे.

Summer Weather
Maharashtra Weather: थंडीच्या लाटेचे गूढ! महाराष्ट्रात अचानक तापमान घसरले

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पेरूजवळ समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २० अंश सेल्सिअस, तर इक्वेडोरजवळ ते २६ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव अल्पशा प्रमाणात राहील. हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस आणि अरबी समुद्राचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल.

कोकण

कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, पालघर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४५ टक्के राहील, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६५ टक्के राहील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत २१ ते २३ टक्के, तर रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ४० ते ४२ टक्के राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ कि.मी. इतका राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत पूर्वेकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ५१ टक्के,

तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ८१ ते ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात २३ टक्के, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ४२ ते ६६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २ ते ३ कि.मी., तर जळगाव जिल्ह्यात ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्य व ईशान्येकडून राहील.

Summer Weather
Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पुन्हा वाढले; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात झाली वाढ

मराठवाडा

जालना, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान हिंगोली जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर परभणी व नांदेड जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, तर हिंगोली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर लातूर व बीड जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील.

सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. लातूर, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३३ टक्के, तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत ४२ ते ४६ टक्के राहील. बीड जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २० ते २२ टक्के, तर बीड व धाराशिव जिल्ह्यांत ३१ ते ३७ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० कि.मी. राहील.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर अमरावती जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ४८ टक्के, अमरावती जिल्ह्यात ५६ टक्के व वाशीम जिल्ह्यात ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३२ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात ५२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५० ते ५३ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३४ ते ३५ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ५१ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५५ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ६७ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३७ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ७ कि.मी., तर भंडारा जिल्ह्यात ८ कि.मी. व गडचिरोली जिल्ह्यात ताशी ५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अहिल्यानगर जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर सांगली व पुणे जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहणे शक्य आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता अहिल्यानगर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ५१ ते ५७ टक्के, तर सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ६५ ते ६६ टक्के आणि पुणे जिल्ह्यात ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत २४ ते २९ टक्के आणि पुणे जिल्ह्यात ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com