Maharashtra Weather: उष्ण लाटेपाठोपाठ गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Hailstorm Alert: राज्यभर उष्णतेने कहर केला असून, विदर्भातील ब्रह्मपुरी आणि अकोला येथे तापमानाने ४५ अंशांचा उच्चांक गाठला. याच वेळी, हवामान विभागाने राज्यात वादळी पावसाचे आणि गारपिटीचे इशारे दिले आहेत.
Weather Forecast
Weather ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News: सूर्याच्या आगीत राज्य भाजून निघत असताना आता वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. २६) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. अकोल्यात उष्ण लाटेचा इशारा कायम आहे.

उत्तर मराठवाड्यापासून, कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात ऊन असह्य होत असून, जमीन अक्षरशः करपून निघत आहे. उकाड्याने घामाच्या धारादेखील त्रासदायक ठरत आहेत. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपिटीची नोंद झाली. कोल्हापुरातील हातकणंगले, सांगलीतील कसबेडिग्रज, जत येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Weather Forecast
Climate Change : पुढील तीन महिन्यात जगभरात तापमान वाढणार; जागतिक हवामानशास्त्र संघटनेने व्यक्त केली चिंता

‎‎शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ‎अकोला आणि चंद्रपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, नागपूर, ‎यवतमाळ, अमरावती, ‎गडचिरोली, ‎वर्धा येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, ‎‎जळगाव, ‎जेऊर, ‎मालेगाव, ‎परभणी आणि ‎वाशीम येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

आज (ता. २६) अकोला येथे उष्ण लाट येण्याची शक्यता असल्याने, ‎तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत दुपारनंतर गडगडाटी वादळासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. २७) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---४०.५---२४.०

‎अहिल्यानगर---निरंक---२३.६

‎धुळे---४२.५---२०.६

‎जळगाव---४३.२---२५.६

‎जेऊर---४३.५---२४.०

‎कोल्हापूर---३४.३---२२.३

महाबळेश्‍वर---३२.६---२१.०

‎मालेगाव---४३.०---२४.६

‎नाशिक---३८.३---२१.९

‎निफाड---३९.८---२०.५

‎सांगली---३५.८---२४.६

‎सातारा---४०.३---२४.६

Weather Forecast
Paus Andaj: राज्यात पाऊस, गारपीटीचा अंदाज; राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा

‎सोलापूर---४२.३---२८.९

‎सांताक्रूझ---३३.७---२४.६

‎डहाणू---३५.०---२३.९

‎रत्नागिरी---३३.५---२५.८

‎छत्रपती संभाजीनगर---४१.४---२६.६

‎धाराशिव---४२.०---२५.०

‎परभणी---४३.४---२५.६

‎परभणी (कृषी)---४२.२---२२.४

‎अकोला---४५.२---२७.२

‎अमरावती---४४.२---२३.९

‎भंडारा---४२.४---२५.०

‎बुलडाणा---४०.६---२७.७

ब्रह्मपुरी---४५.९---२७.४

‎चंद्रपूर---४५.०---निरंक

‎गडचिरोली---४४.०---२४.०

‎गोंदिया---४२.६---२४.४

‎नागपूर---४४.४---२३.८

‎वर्धा---४४.०---२५.४

‎वाशीम---४३.२---निरंक

‎यवतमाळ---४४.४---२४.०

‎सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२३.८---४५.९

‎मराठवाडा---२२.४---४३.४

‎पश्‍चिम महाराष्ट्र---२१.०---४३.५

‎उत्तर महाराष्ट्र---२०.५---४३.०

‎कोकण---२४.६---३६.३

उष्ण लाटेचा इशारा ( येलो अलर्ट) : अकोला

गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) : सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली

४४ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : ‎ब्रह्मपुरी ४५.९, ‎अकोला ४५.२, ‎चंद्रपूर ४५, नागपूर ४४.४, ‎यवतमाळ ४४.४, अमरावती ४४.२, ‎गडचिरोली ४४, ‎वर्धा ४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com