Summer Heat Update : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या

Weather Update : कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार गेल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार गेल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. किमान तापमानात वाढ होत असली तरी पहाटे गारठा टिकून आहे. आज (ता. ८) राज्याच्या तापमानात वाढ होत उन्हाची ताप वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या पंधरा दिवसांत राज्याच्या हवामानात वेगाने बदल झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस गारपिटीपाठोपाठ किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला. मात्र आता पुन्हा कमाल तापमानात वेगाने वाढ होऊ लागली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका, उकाडा कायम वाढल्याचे चित्र आहे.

Weather Update
Weather Update : पहाटे गारठा, दुपारी उन्हाच्या झळा

गुरूवारी (ता. ७) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.० अंश तापमानाची नोंद झाली. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांत वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३८.८अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या पार गेला आहे.

ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, पश्चिम विदर्भापासून कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून, आज (ता.८) कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Weather Update
Weather Update : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात गारपिटीचा इशारा वादळी पावसाचाही अंदाज; उन्हाचा चटका वाढला

गुरूवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.० (११.३), धुळे ३५.० (१०.४), जळगाव ३४.८ (१४.९), कोल्हापूर ३५.४ (१७.६), महाबळेश्वर २९.६ (१५.९), मालेगाव ३७.८ (१६.४), नाशिक ३२.८ (१४.१), निफाड ३२.८ (९.०), सांगली ३६.४ (१७.४), सातारा ३४.७ (१२.९), सोलापूर ३८.६ (२१.२), सांताक्रूझ ३२.२ (१९.०), डहाणू २९.३ (१६.९), रत्नागिरी ३२.२ (१६.८),

छत्रपती संभाजीनगर ३४.४ (१७.२), नांदेड ३६.२ (१९.६), परभणी ३७.६ (१९.१), अकोला ३७.५ (१७.३), अमरावती ३६.० (१७.८), बुलढाणा ३५.४ (१७.८), ब्रह्मपूरी ३७.८ (२०.०) चंद्रपूर ३७.८ (२०.०), गडचिरोली ३५.० (१९.२), गोंदिया ३५.२ (१८.८), नागपूर ३६.६ (१९.५), वर्धा ३७.५ (२०.२), वाशीम ३८.८ (१५.२), यवतमाळ ३७.५ (१७.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com