Climate Change : ‘एल निनो’ काळामध्ये हवामानातील बदल

El Nino Effect : ‘एल निनो’ वर्षातील हिवाळ्यात पहाटेच्या किमान तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. दिवसातील दुपारचे कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिले. खरेतर ही एक वेगळीच वातावरणीय घटना या वर्षी पाहायला मिळाली. त्यामुळे संपूर्ण हिवाळ्यात दिवसा थंडी जाणवत आहे.
Agriculture Climate Change
Agriculture Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

माणिकराव खुळे

या वर्षी सरासरीइतक्या दीर्घकालीन पावसाचा अंदाज असताना आयओडी धन अवस्थेत असूनही त्याची साथ न मिळाल्यामुळे ‘एल निनो’ काळात जून ते सप्टेंबरच्या पावसाळी हंगामातील चार महिन्यांत सरासरीच्या खालच्या पातळीतील कमी पाऊस झाला.

जून आणि ऑगस्ट या महिन्यांत खूपच कमी पाऊस झाला. तोही असमान वितरणात झाला. त्यामुळे खरिपाबरोबर पुढे येणाऱ्या रब्बी हंगामासाठी टंचाईसदृश स्थिती जाणवू लागली होती.

‘एल निनो’मुळे घडून आलेल्या वातावरणीय घटना

एल निनोचा गुणधर्म आणि दाखवलेल्या अपेक्षित परिणामानुसार या वर्षी विविध वातावरणीय घटना दिसून आल्या.

संपूर्ण देशामध्ये उष्णता टिकून राहिली. अपुरा पाऊस झाला.

उत्तर भारतात पश्चिमी झंजावाताची तीव्रता सामान्य राहिली. थंडीच्या लाटा कमी राहिल्या. बर्फ कमी प्रमाणात पडले. पश्चिमी झंजावाताची वारंवारता टिकून राहिली, पण तीव्रता कमीच राहिली. पश्चिमी झंजावातांनी प्रमाणातच आर्द्रता वाहून आणली.

आर्टिक आणि सैबेरियन थंड कोरडे वारे अधिक दक्षिणेकडील समशीतोष्ण कटिबंधावरील अक्षवृत्त वर सरकले नाहीत. तसेच धुक्याचे प्रमाण अधिक राहिले.

Agriculture Climate Change
Al Nino Effect : ‘एल निनो’ ओसरतोय

महाराष्ट्रातील परिणाम

हवेत कधीच अतिरिक्त दमटपणा वाढला नाही. 

अति टोकाची थंडी अनुभवली नाही. ढगाळ वातावरण नसल्यामुळे पडणाऱ्या थंडीला अटकाव झाला नाही. सकाळच्या वेळी दवीकरण अल्पच घडून आले.

पहाटेच्या किमान तापमानात चढ-उतार जाणवले. दुपारचे कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिले.पहाटेचे किमान तापमान माफक, पण कमाल तापमान कमीच राहिल्यामुळे दिवसाही थंडी जाणवत राहिली.

एल निनोच्या गुणधर्मनुसार संपूर्ण हंगामात या वर्षी उष्णता टिकून राहिली. या उष्णतेमुळेच या वर्षी जरी आर्द्रता वाढली असली तरी अपुऱ्या आणि टंचाईयुक्त पावसामुळे जमिनीत पाणी मुरले नाही. त्यामुळे जमिनीत अपुरा ओलावा राहिला. त्याचबरोबर एल निनोमुळे मर्यादित राहिलेले पहाटेचे किमान तापमान यातून हवेत कधीच अतिरिक्त दमटपणा या वर्षी संपूर्ण हंगामात वाढलाच नाही.म्हणूनच अपाय करणारे दवीकरण अल्प प्रमाणात घडून आले.

महाराष्ट्रावर थंडीचा परिणाम

उत्तर भारतात ऑक्टोबर २०२३ पासूनचे पश्चिमी झंजावाताचे वर्तन वेगळे होते. यामुळे महाराष्ट्रावर थंडीचा परिणाम या वर्षी दिसून आला. एल निनो वर्षात पश्चिमी झंजावाताची वारंवारता जरी टिकून राहिली पण त्यांची तीव्रताही अपेक्षेप्रमाणे सामान्यच होती. उत्तर भारतात थंडीच्या लाटा कमी जाणवणार होत्या, तशा त्या जाणवल्या. यंदा अति टोकाची थंडी आपण अनुभवली नाही. बर्फ कमी प्रमाणात पडले.

एल निनो मुळे मध्यम तीव्रतेत मार्गक्रमण करणाऱ्या पश्चिमी झंजावातांनी प्रमाणातच आर्द्रता वाहून आणली. एल निनोमुळे आर्टिक आणि सैबेरियन थंड कोरडे वारे दक्षिणेकडील समशितोष्ण कटिबंधावरील अक्षवृत्तावर येऊन पश्चिमी झंजावातांनी आणलेल्या आर्द्रतेत मिसळण्याची प्रक्रिया घडून आली नाही. परिणामी  गिलगिट, बाल्टीस्तान, जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसहित संपूर्ण उत्तर भारतात अपुऱ्या थंडीमुळे धुक्याचे प्रमाण अधिक राहिले. खूप कमी प्रमाणात पाऊस व बर्फ पडला. म्हणून हिवाळ्यात महाराष्ट्रात अति टोकाची थंडी जाणवली नाही. परिणामी, महाराष्ट्राने बेताची पण सातत्यपूर्ण थंडी अनुभवली. 

रब्बी हंगामाची अवस्था

यंदा एल-निनो अधिकच तीव्र होणार, अशा बातम्या येऊ लागल्या होत्या. पण एल निनोमुळेच शेतपिकांना थंडी मिळणार आणि रब्बी हंगाम चांगला जाईल असा दिलासा देण्यात आला.

नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू होणाऱ्या आणि मार्च २०२४ मध्ये सांगता होणाऱ्या यंदाच्या रब्बी हंगामापूर्वीच वातावरणीय घडामोडींच्या भाकितानुसार, एल निनो वर्षातील यंदाचा रब्बी हंगाम मध्यम का होईना पण पूरक थंडीमुळे शक्य होत आहे. खरं तर एल निनोमुळे थंडीद्वारे रब्बी हंगामाची घडी बसली.

एल निनो वर्षातील हिवाळ्यात पहाटेच्या किमान तापमानात चढ-उतार जाणवले. पण दिवसातील दुपारचे कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिले. खरेतर ही एक वेगळीच वातावरणीय घटना या वर्षीच्या एल निनो वर्षात पाहावयास मिळाली. त्यामुळे संपूर्ण हिवाळ्यात दिवसा थंडी जाणवत राहिली आणि अजूनही ती जाणवत आहे.

फेब्रुवारी महिन्यासाठीच्या मासिक अंदाजानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण दरवर्षीच्या सरासरी थंडीपेक्षा कमीच जाणवेल, असे वाटते.

Agriculture Climate Change
Super El Nino : उन्हाळ्यात जाणवणार ‘सूपर एल-निनो’चा प्रभाव

दिवसाच्या उबदारपणाबाबत बोलावयाचे झाल्यास, कोकण व उत्तर महाराष्ट्रातील १२ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान या महिन्यातील सरासरी तापमानाइतके म्हणजे दिवसाचा उबदारपणा नेहमीसारखाच जाणवेल. कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर या जिल्ह्यात या महिन्यात उबदारपणा सरासरीपेक्षा अधिक जाणवेल.

सहसा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दोन ते तीन आठवड्यांत थंडी जाणवते, तर शेवटच्या आठवड्याच्या आसपास मात्र थंडी कमी होत जाते. परंतु या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात काहीशी थंडी जाणवेल तर आठवड्याच्या शेवटी थंडी कमी जाणवेल, असे वाटते. थंडीच्या लाटेची शक्यता मात्र संपूर्ण महिन्यात महाराष्ट्रात जाणवणार नाही.

फेब्रुवारीतील पावसाची शक्यता

फेब्रुवारी महिन्यात पावसाची मासिक सरासरी ही अगदी नगण्य असते. तरी देखील या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अंदाजानुसार या महिन्यात पावसासंबंधी भाष्य करताना, असे सांगता येईल की, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दर्शवते. परभणी, नांदेड, हिंगोली वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात ही शक्यता अधिक जाणवते.

कोकणात मात्र पावसाची शक्यता सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.

रब्बी हंगामातील पीक परिस्थितीचा अंदाज

रब्बी हंगामात एल निनोमुळे थंडी विशेष जाणवली नाही, दवीकरण नाही, ढगाळ वातावरण नाही, दमटपणा नाही. या परिणामामुळे पाणीटंचाईत रब्बी पिके जगवण्यासाठी एल निनो वर्षात वातावरणाने शेतकऱ्यांना मदत झाली, असे म्हणता येईल.

रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणात मावा, बुरशी, किडींचा प्रादुर्भाव झाला नाही.

अति पावसाच्या अभावामुळे शेतपिकातील तणांची नियंत्रणात वाढ झाली. तणनाशक, बुरशीनाशक, कीडनाशकाच्या अति फवारण्या टाळल्या गेल्या.

पिकांना लागणारी सिंचनाच्या आवर्तनाची वारंवारता मर्यादितच राहून पाण्यासाठीची टोकाची ओढ निर्माण झाली नाही.

पिके दवीकरणाच्या अपायापासून अबाधित राहिली.

ढगाळ वातावरण नसल्यामुळे पडणाऱ्या थंडीला अटकाव झाला नाही. माफक प्रमाणात परंतु सतत थंडी पिकांना मिळत गेली. निरभ्र आकाशामुळे प्रकाशसंश्लेषण कालावधी वाढला गेला. त्यामुळे पिके पोसण्यात अडचण जाणवली नाही.

अतिरिक्त पाऊस न झाल्यामुळे जे काही पाणी पिकांना उपलब्ध झाले, तेवढे मिळालेले  पाणी पुरेसे ठरले. हवे तेवढे गरजेइतकेच मिळालेल्या माफक पाण्याच्या सिंचनातून या वर्षी पिकांची योग्य वाढ झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com