Weather Update : राज्यात उन्हाळ्याची चाहूल

Weather Forecast : अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.
Weather
Weather Agrowon

Pune News : अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांपार गेल्याने राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यवतमाळ येथे देशातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ३) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

Weather
Maharashtra Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज ; यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरणार

राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्याने रब्बी पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. शनिवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील यवतमाळ येथे देशातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Weather
Weather Update : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात गारपिटीचा इशारा वादळी पावसाचाही अंदाज; उन्हाचा चटका वाढला

तर ब्रह्मपुरी येथे ३९, वाशीम येथे ३८.२ आणि सोलापूर येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. पश्चिम राजस्थान आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

आज (ता.३) पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३८ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे : यवतमाळ ३९.५, ब्रह्मपुरी ३९, वाशीम ३८.२, सोलापूर ३८. वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : भंडारा, गोंदिया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com