Maharashtra Cold : उत्तर भारतात हिमवर्षाचा अंदाज; राज्यात सकाळी थंडीचा कडाका कायम

Weather Update : अनेक ठिकाणी सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. तर काही भागात हिमवर्षा होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
Cold Weather
Cold WeatherAgrowon

Pune News : राज्यात सकाळी थंडी कायम आहे. उत्तर भारतातही किमान तापमान कायम आहे. तर अनेक ठिकाणी सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. तर काही भागात हिमवर्षा होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 

उत्तर भारतात थंडी ओसरली आहे.  पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या अनेक भागात आज किमान तापमान ७ अंश ते १२ अंशाच्या दरम्यान होते. तर उत्तर प्रदेशातील नजीबाबाद यथे नीचांकी ७ अंश सेल्सिअस तापमानााची नोंद झाली होती.

Cold Weather
Cold Weather Update : गारठा कायम राहण्याची शक्यता

उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही स्थिती निवळली असली तरी, काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवर्षा होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याची चादर दिसून येत आहे. 

Cold Weather
Maharashtra Cold : किमान तापमान घटण्याची शक्यता

राज्यात थंडीचे प्रमाण कायम दिसते. सकाळी थंडीची तीव्रता जाणवत आहे. पण राज्यातील थंडीही मागील काही दिवसांमध्ये थंडी काहीशी कमी झालेली दिसते.

किमान आणि कमाल तापमानातही वाढ दिसून आली. उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे. देशातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com