Maharashtra Monsoon Update : राज्यात पोषक हवामान होत असल्याने पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत आहेत. आज (ता. १७) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हिमालयाच्या पायथ्याकडे असलेला मॉन्सूनचा आस उद्यापासून (ता. १८) त्याच्या सर्वसाधारण स्थितीत येण्याची शक्यता आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
त्यांच्या प्रभावामुळे उद्या (ता. १८) उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वायव्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
सर्वसाधारण स्थितीत येणारा मॉन्सून आस, बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. आज (ता. १७) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांचा कडकडाट, गडगडाटासह हलका ते माफक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.