August Paus Andaj: ऑगस्टमध्ये पाऊस चिंता वाढवणार; विदर्भ, मराठवाड्यात ऑगस्टमध्ये कमी पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्यात पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. कारण ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News : ऑगस्ट महिन्यात पाऊस  शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. कारण ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. विशेषतः जूनपासून आतापर्यंत कमी पाऊस झालेल्या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील काही भागात ऑगस्ट महिन्यातही पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे. 

ऑगस्ट महिना कमी पावसाचा असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाचे चांगले पुरागमन होऊ शकते. कारण हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमधील पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज दिला. म्हणजेच ऑगस्टमध्ये कमी पाऊस राहीला तरी सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस मिळेल.

Rain Forecast
August Monsoon Rain : ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस; ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार: हवामान विभाग

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी आज मॉन्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. देशाचा विचार केला तर, मॉन्सून हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला.  पूर्वोत्तर राज्ये, लगतच्या पूर्व भारतातील राज्ये, लडाख, सौराष्ट्र, कच्छ, मध्य आणि दक्षिण द्विपकल्पाचा तुरळक भाग वगळता देशात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये पाऊस काहीशी उसंत घेण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी देशात सरासरीइतका ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये हिमालयाचा पायथा, पूर्व मध्य भारत, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य भारताचा दक्षिण भाग, पूर्व भारत आणि दक्षिण द्विपकल्पाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. थोडक्यात उर्वरित हंगामाचा विचार करता देशातही ऑगस्ट महिन्यात कमी तर सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Rain Forecast
Monsoon Rain : पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; विदर्भात आणि कोकणात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसाधारण एल-निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टमनुसार मॉन्सून हंगामात अखेरच्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ला-निना स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. भारतीय समुद्रात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी सर्वसाधारण स्थितीत आहे. उर्वरित मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे ऑगस्टनंतर पावसाला पोषक स्थिती राहण्याचे संकेत मिळत आहेत. 

ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात ला - निना स्थितीचे संकेत असल्याने सप्टेंबर मध्ये चागंला पाऊस होईल. जुलै महिन्यात समाधानकारक बरसणारा मॉन्सून ऑगस्टमध्ये काहीसा रुसण्याचे संकेत आहेत. ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com