Monsoon Rain : पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; विदर्भात आणि कोकणात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

Maharashtra Rain Forecast : हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार तर अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.
Monsoon
Monsoon Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील अनेक भागात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. मात्र हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार तर अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने पुढील ५ दिवस कोकणात बहुतांशी ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. मध्य महाराष्ट्रातही पहिले ३ दिवस बहुतांशी ठिकाणी आणि नंतर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पुढील ७ दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Monsoon
Monsoon Rain 2024 : वरुणाचा कृपावर्षाव

उद्या हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला बहुतांशी ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील इतर भागात आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

Monsoon
August Monsoon Rain : ऑगस्टमध्ये विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस; ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार: हवामान विभाग

शनिवारी राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. सातारा जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर संपूर्ण कोकण आणि पुणे तसेच नाशिक जिल्ह्यात काही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर संपूर्ण विदर्भ, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

रविवारी आणि सोमवारी विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com