Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथा अन् विदर्भात पावसाचा वाढणार जोर

Weather Forecast : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातही अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज (ता. ८) कोकण, घाटमाथा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीत कायम असून, राजस्थानच्या बिकानेरपासून, सिकार, ग्वालियर, सिधी, दाल्तोंगंज, ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीसाठी ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Rain
Weekly Weather : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भ जोरदार तर उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे २२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायगडसह, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.

राज्यात ढगाळ हवामान झाले असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ८) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरचा घाटमाथा आणि विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

Rain
Monsoon Rain : पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

रविवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण :

मुंबई शहर : कुलाबा ६१.

पालघर : जव्हार ५७, मोखाडा ५४.

रायगड : कर्जत ११५, खालापूर १०६, माणगाव ६६, माथेरान २२०, म्हसळा ५३, मुरूड ७०, पनवेल १२१, पेण ८०, पोलादपूर ५९, रोहा ८२, सुधागडपाली ८१, उरण ५०.

रत्नागिरी : दापोली ७२, गुहागर ६७, हर्णे ५४, लांजा १०७, मंडणगड १०५, राजापूर १३५, रत्नागिरी १४६, संगमेश्वर १०२, सावर्डे ५३, वाकवली ७२,

सिंधुदुर्ग : आवळेगाव ९१, दोडामार्ग ७३, कणकवली ५९, कुडाळ ४५, रामेश्वर ४६, सावंतवाडी ४८.

ठाणे : आंबरनाथ ४१, भिवंडी ४९, मुरबाड ११५, शहापूर ९०, ठाणे ५५.,

मध्य महाराष्ट्र :

धुळे : शिरपूर ३०.

जळगाव : अंमळनेर २८, यावल ९३.

कोल्हापूर : आजरा ५०, चंदगड ९५, गगनबावडा १७९, राधानगरी ५८, शाहूवाडी ४०.

नाशिक : हर्सूल ५२, इगतपुरी ४७, ओझरखेडा ६९, पेठ ६७, सुरगाणा ६०, त्र्यंबकेश्वर ५२, येवला ४१.

पुणे : राजगुरूनगर २५, लोणावळा कृषी १३१, पौड २८, वडगाव मावळ २३, वेल्हे ३८.

सांगली : कडेगाव २७, कोकरूड ४०, तासगाव २३.

सातारा : महाबळेश्वर ५६.

मराठवाडा :

बीड : पाटोदा २९.

नांदेड : किनवट ५५, लोहा २७, माहूर २६, मुदखेड ३७, नायगाव खैरगाव ४२.

विदर्भ :

अकोला : अकोट २७, बाळापूर २०.

भंडारा : लाखंदूर २९, लाखणी २१, मोहाडी २३, तुमसर ५६.

बुलडाणा : मेहकर २५.

चंद्रपूर : बल्लारपूर ७४, ब्रह्मपुरी ४८, चंद्रपूर ४७, चिमूर ४४, गोंडपिंपरी ५२, जेवती ५६, कोर्पणा ७६, नागभिड ४७, पोंबुर्णा ५३, राजूरा ७६, वरोरा ४७.

गडचिरोली : चामोर्शी ५९, देसाईगंज वडसा ५७, धानोरा ३५, कुरखेडा ५३, मुलचेरा ८५.

गोंदिया : अर्जुनी मोरगाव ४३, तिरोडा १०७,

वर्धा : देवळी ४६, हिंगणघाट ३६.

यवतमाळ : घाटंजी २८, कळंब २६, मारेगाव ६१, पांढरकवडा ५१, पुसद ३३, वणी ४६, झारी झामणी ४४.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.

१०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :

माथेरान २२०, पनवेल १२१, कर्जत ११५, खालापूर १०६, (जि. रायगड), रत्नागिरी १४६, राजापूर १३५, लांजा १०७, मंडणगड १०५, संगमेश्वर १०२ (जि. रत्नागिरी), मुरबाड ११५ (जि. ठाणे), गगनबावडा १७९ (जि. कोल्हापूर), लोणावळा कृषी १३१ (जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com