Weekly Weather : हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Agriculture Weather : आजपासून मंगळवारपर्यंत (ता.७ ते ९) बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील.
Monsoon
Monsoon Agrowon
Published on
Updated on

Monsoon Weather Update : महाराष्ट्रावर आज (ता. ७) १००० हेप्टापास्कल, तर उद्या व मंगळवारी (ता.८, ९) १००२ हेप्टापास्कल, बुधवारी (ता. १०) १००४ हेप्टापास्कल, गुरुवारी (ता. ११) १००६ हेप्टापास्कल, तर शुक्रवारी (ता. १२) १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. आज (ता. ७) पावसाचे प्रमाण अधिक राहील. यापुढे आठवडाभर पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहील.

आजपासून मंगळवारपर्यंत (ता.७ ते ९) बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील. बुधवारी व गुरुवारी (ता.१०, ११) बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब होताच, बंगालच्या उपसागराची शाखाही कमकुवत होईल.

मात्र शुक्रवारी (ता. १२) १००२ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब होताच, ही शाखा काही प्रमाणात पुन्हा सक्रिय होईल. या सर्व हवामान स्थितीवरून या आठवड्यात पावसाला जास्त जोर राहणार नसल्याचे स्पष्ट करत आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्‍चिम, विदर्भ, मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात तसेच कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता राहील. उद्या आणि मंगळवारी (ता.८, ९) नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. नाशिक, धुळे, नंदुरबार, धाराशिव, लातूर, बीड, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० कि.मी. पेक्षा अधिक राहील. या आठवड्यात सर्वच जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील.

कोकण

आज आणि उद्या (ता.७,८) सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिनी ७० मिमी पावसाची शक्यता आहे. या भागात मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे. तर रायगड व ठाणे जिल्ह्यातही प्रतिदिनी २० ते ३० मिमी पावसाची शक्यता असून, मुसळधार पाऊस होणे शक्य आहे. मात्र पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या (ता.७,८) प्रतिदिनी ९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १० ते १६ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ९० ते ९२ टक्के, तर रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत ८६ ते ८८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ७० ते ८० टक्के इतकी राहील.

Monsoon
Maharashtra Rain : अकोला जिल्ह्यात १० मंडलांमध्ये १०० मिलिमीटरच्या आत पाऊस

उत्तर महाराष्ट्र

आज (ता.७) नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी. इतक्या मध्यम पावसाची, तर धुळे जिल्ह्यात अल्प पावसाची शक्यता आहे. सोमवारी (ता.८) सर्वच जिल्ह्यांत १ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १८ ते २१ किमी इतका राहील. कमाल तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर जळगाव व नाशिक जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः किंवा पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ७८ टक्के, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत ८२ ते ८७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५५ ते ६६ टक्के राहील.

मराठवाडा

आज (ता.७) धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अत्यल्प ते अल्पशा पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.८) नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ५ ते ७ मि.मी. इतक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत अल्प ते अत्यल्प पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १९ कि.मी., तर धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ताशी २० कि.मी. आणि बीड जिल्ह्यात ताशी २२ कि.मी. राहील. कमाल तापमान लातूर, नांदेड, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर धाराशिव, हिंगोली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, लातूर, नांदेड, बीड व परभणी या जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६० टक्के राहील.

Monsoon
Monsoon Update : मॉन्सून सक्रिय होण्याचे संकेत

पश्‍चिम विदर्भ

आज (ता.७) बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३ मि.मी., तर वाशीम जिल्ह्यात ५ मि.मी. आणि अमरावती जिल्ह्यात १२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.८) बुलडाणा जिल्ह्यात ६ मि.मी., अकोला जिल्ह्यात १७ मि.मी., वाशीम जिल्ह्यात ११ मि.मी. व अमरावती जिल्ह्यात २५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर उर्वरित बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज (ता.७) यवतमाळ जिल्ह्यात १ मि.मी., वर्धा जिल्ह्यात ८ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात १४ मि.मी. राहील. उद्या (ता.८) यवतमाळ जिल्ह्यात १५ मि.मी., वर्धा जिल्ह्यात २३ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात १८ मि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १६ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६६ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज (ता.७) चंद्रपूर जिल्ह्यात १ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात ९ मि.मी. भंडारा जिल्‍ह्यात १२ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.८) चंद्रपूर जिल्ह्यात ८ मि.मी., भंडारा जिल्ह्यात १८ मि.मी., गोंदिया जिल्ह्यात २२ मि.मी. व गडचिरोली जिल्ह्यात २२ मि.मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ८० ते ८५ टक्के, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ९० ते ९१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६२ ते ६५ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज (ता. ७) कोल्हापूर जिल्ह्यात २२ मि.मी., तर सांगली जिल्ह्यात ३ मि.मी. व सातारा जिल्ह्यात ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उर्वरित सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २ मि.मी.पर्यंत पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. ८) कोल्हापूर जिल्ह्यात ४ मि.मी., सातारा जिल्ह्यात २ मि.मी., पुणे जिल्ह्यात २.५ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात १ मि.मी., सांगली जिल्ह्यात १.५ मि.मी. व नगर जिल्ह्यात १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली जिल्ह्यात २५ कि.मी., तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ताशी २२ कि.मी. राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी १५ ते १९ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर पुणे व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील.

कृषी सल्ला

उन्हाळ्यात तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये फळपिकांच्या कलमांची लागवड करावी.

कलमाच्या खाली आलेली नवीन फूट काढून टाकावी. नवीन कलमांच्या बुंध्याजवळ पाणी साचणार नाही.

भात रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

पावसाळ्यात गोठ्यात जीवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी गोठा कायम कोरडा राहील याची काळजी घ्यावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com