Maharashtra Rain Update : मराठवाडा आणि विदर्भात वीजांसह पावसाचा इशारा

राज्यात मागील चार दिवसांमध्ये कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढला होता. कमाल तापमान ३५ ते ३९ अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले गेले.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Weather Update : राज्यात मागील चार दिवसांमध्ये कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढला होता. कमाल तापमान ३५ ते ३९ अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले गेले.

मात्र आता पुन्हा हवामान विभागाने पुढील ३ दिवस म्हणजेच ६, ७ आणि ८ एप्रिल रोजी राज्यातील विविध भागात वादळी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच ३० ते ४० किलोमीटर प्रतिताशी वारे वाहण्याचा शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात पुढील २४ तासांमध्ये विजा, मेघगर्जनासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. ६ ते ७ एप्रिलच्या दरम्यान विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाला हवामान पोषक राहण्याची शक्यता आहे.

तर ६ ते ८ एप्रिलच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिण जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभगाने दिला आहे.

Rain Update
Maharashtra Weather Update : यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा अंदाज

६ एप्रिलला मराठवड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर ८ एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट, वाऱ्याच्या वेगासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तर विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपुर, भंडारा जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मागील महिन्याभरापासून वादळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. उन्हाळी भुईमूग पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी तूषार किंवा ठिबक पध्दतीचा वापर करावा. भुईमूग पिकात आऱ्या सुटल्यानंतर अंतर मशागत करू नये.

काढणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकाची मळणी लवकरात लवकर करून घ्यावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेल्या गहू पिकाची मळणी यंत्राच्या सहाय्याने लवकरात लवकर करावी. मळणी करतांना दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.

Rain Update
Weather Update : एप्रिल, जूनमध्ये तापमान सरासरी राहण्याचा अंदाज

सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता हळदीची उघडयावर साठवण करू नये, असा सल्ला तज्ज्ञानी दिला आहे.

झारखंड ते ओडिशा, आंध्र प्रदेश, रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com