Maharashtra Weather Update : यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा अंदाज

कोकण, सह्याद्री घाटमाथा, व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या ८० टक्के भूभागावर यावर्षीचा एप्रिल,मे,जून महिन्यातील उन्हाळा म्हणजे दुपारचे कमाल तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के जाणवते.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

माणिकराव खुळे

कोकण, सह्याद्री घाटमाथा, व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राच्या ८० टक्के भूभागावर यावर्षीचा एप्रिल,मे,जून महिन्यातील उन्हाळा (Summer Season) म्हणजे दुपारचे कमाल तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के जाणवते.

म्हणजेच महाराष्ट्राच्या ८० टक्के भूभागावर यावर्षीचा उन्हाळा आल्हाददायक असण्याची शक्यता जाणवते.

मात्र कोकण(मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा ) आणि सह्याद्रीचा घाटमाथा(पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मावळ, मुळशी, पोलादपूर, महाबळेश्वर, पाटण, शाहूवाडी, बावडा ते चंदगडपर्यंत)तसेच पूर्व विदर्भातील (भंडारा, गोंदिया, गडचिरोली) जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची सर्वाधिक शक्यताही तितकीच म्हणजे ५५ टक्के जाणवते.

म्हणजेच केवळ फक्त या २० टक्के महाराष्ट्रातील भूभागावर उन्हाळा कडक असण्याची शक्यता जाणवते.

Weather Update
Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढणार

संपूर्ण उन्हाळ्यातील किमान तापमान(पहाटेचा गारवा)

१) काहीसा कोकण, दक्षिणेकडील महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ६५ टक्के भूभागावर या वर्षीचा एप्रिल,मे,जून या महिन्यातील पहाटेचे किमान तापमान हे सरासरी तापमाना इतकेच असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के जाणवते. म्हणजेच महाराष्ट्रातील या ६५ टक्के भूभागावर पहाटेचा गारवा जाणवेल, असे वाटते.

२) मात्र कोकण व दक्षिणेकडील महाराष्ट्रातील मुंबईसहित ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ४५ टक्के जाणवते.

म्हणजेच महाराष्ट्रातील केवळ फक्त ३५ टक्के भूभागावर म्हणजेच वरील जिल्ह्यात पहाटेचा गारवा हा कमीच जाणवेल, असे दिसते.

३) एकंदरीत संपूर्ण उन्हाळ्यात मुंबई ठाणे रायगड खानदेश नाशिक नगर व विदर्भातील जिल्ह्यात १-२ दिवस आली तर उष्णता सदृश लाट येऊ शकते, अन्यथा नाही.

एप्रिल महिन्यातील उष्णता

१) महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पूर्व विदर्भातील गोंदिया,भंडारा,गडचिरोली जिल्ह्यातील दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची सर्वाधिक (४५ टक्के) शक्यता आहे.

यामुळे एप्रिल महिन्यात जरी दिवसा उबदारपणा जाणवण्याची शक्यता असली तरी विदर्भ, मराठवाड्यासहित महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पहाटेचे किमान तापमान मात्र हे सरासरीपेक्षा कमी असण्याची सर्वाधिक शक्यताही ४५ टक्के जाणवते. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण एप्रिल महिना सुसह्य जाणवून उष्णतेच्या लाटेविना जाऊ शकतो असे वाटते.

Weather Update
उन्हाळा कांदा लागवडीचा प्रश्‍न गंभीर वळणावर 

२) मुंबई, ठाणे, रायगड, खानदेश,नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संपूर्ण एप्रिल महिन्यात केवळ २ ते ४ दिवस उष्णता सदृश स्थिती जाणवू शकते, अन्यथा नाही.

एप्रिल महिन्यातील पावसाची शक्यता

१) महाराष्ट्रात संपूर्ण एप्रिल महिन्यात पावसाची सरासरी संपूर्ण राज्य व पूर्ण महिन्यासाठी ही साधारणच असते.

२) यावर्षी एप्रिल महिन्यातील पावसाची शक्यता ही केवळ सरासरी किंवा त्यापेक्षा कमी अशा संमिश्र शक्यतेची जाणवते. त्यामुळे उन्हाळी पिकांना एकंदरीत वातावरण अनुकूलच समजावे.

३) येणारा पावसाळा किंवा 'एल-निनो' संबंधीची माहिती येत्या १० ते १२ दिवसानंतर आपण जाणून घेऊयात.

(लेखक हवामान तज्ज्ञ आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com