Rain Forecast : मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा

Weather Update Maharashtra : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्यात थंडी कमी आहे. आज (ता. ९) मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Rain Forecast
Rain Forecast Agrowon

Pune News : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्यात थंडी कमी आहे. आज (ता. ९) मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असल्याने सोमवारी (ता. ८) राजस्थान मधील अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात थंडी ओसरली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. आज (ता. ९) राज्याच्या किमान तापमानात वाढ टिकून राहण्याची शक्यता आहे.

Rain Forecast
Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यापासून गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ९) मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर येथे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

Rain Forecast
Cold Weather : सौम्य ते मध्यम थंडी; ढगाळ हवामान

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.१ (१५.१), धुळे २८.५ (१३.०), जळगाव २८.१ (१३.८), कोल्हापूर २९.३ (१९.१), महाबळेश्वर २४.६ (१४.२), नाशिक २८.८ (१७.४), निफाड २७.५ (१४.०), सांगली २९.४ (१९.८), सातारा ३०.४ (१६.६), सोलापूर ३२.४(१८.६), सांताक्रूझ ३२.० (२२.०), डहाणू २७.३ (२०.०), रत्नागिरी ३२.५ (२३.०),

छत्रपती संभाजीनगर २७.८ (१४.६), नांदेड २८.८ (१७.०), परभणी २९.४ (१५.७), अकोला २९.५ (१७.२), अमरावती २८.८ (१५.८), बुलडाणा २८.० (१६.०), ब्रह्मपुरी ३१.१ (१५.८), चंद्रपूर २९.० (१५.०), गडचिरोली २९.२ (१५.०), गोंदिया २८.५ (१३.६), नागपूर २७.८(१७.०), वर्धा २७.५(१६.५), वाशीम २९.८ (१४.४), यवतमाळ २९.७ (१६.२).

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, नाशिक, नगर.

विजांसह पावसाची शक्यता :

नंदुरबार, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com