Pune News : राज्याच्या काही भागात हलक्या सरी पडत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून दुपारी उन्हाचा चटका काहीसा जाणवत आहे. पण हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.
हवामान विभागाने आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान विभागाने आज धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागात विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावासचा येलो अलर्ट दिला.
तर या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज दिला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
तसेच उद्या म्हणजेच मंगळवारी धुळे, जळगाव, नाशिक आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. तर या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तर ठाणे, पालघर, रायगड, नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.