Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Rain Update : राज्यात पूर्वमोसमी पावसाने काहीशी उघडिप दिली आहे. राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

Pune News : राज्यात पूर्वमोसमी पावसाने काहीशी उघडिप दिली आहे. राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. आज (ता. २०) विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

पूर्व - मध्य अरबी समुद्रात येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर पर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. २२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, त्याची तीव्रता वाढणार आहे.

Weather Update
Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनास हवामान अनुकूल

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाश निवळताच उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. आज (ता. २०) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

Weather Update
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.१, धुळे ४२.५, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३६.४, महाबळेश्वर २९.४, मालेगाव ४१.२, नाशिक ३९.२, निफाड ३९.८, सांगली ३५.८, सातारा ३८.५, सोलापूर ३८.५, सांताक्रूझ ३४.९, डहाणू ३७.०, रत्नागिरी ३४.६, छत्रपती संभाजीनगर ४०.०, बीड ४०.२, नांदेड ३६.२, अकोला ४२.०, अमरावती ४०.०, बुलडाणा ३९.३, ब्रह्मपुरी ४१.०, चंद्रपूर ३८.४, गडचिरोली ३६.६, गोंदिया ३७.०, नागपूर ३६.९, वर्धा ३९.८, वाशीम ३९.८, यवतमाळ ४०.०.

उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बीड, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com