
डॉ. रामचंद्र साबळे
महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. हिमालय पर्वत रांगामध्ये बर्फवृष्टी सुरू असल्याने ईशान्येकडून, उत्तरेकडून व वायव्येकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यामुळे तीव्र थंडी जाणवेल. पहाटे थंडीची तीव्रता अधिक राहील. सूर्याचे दक्षिणायन सुरू असल्याने दिवसाचा कालावधी कमी होईल.
त्यामुळे सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्रीही थंडी जाणवेल. सकाळी हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहण्यामुळे वनस्पतींच्या पानांवर दवबिंदू दिसतील. दाट धुक्याची चादर दिसून येईल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीचे प्रमाण प्रकर्षाने जाणवेल. उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा पूर्व व आग्नेय दिशेकडून राहील. त्याचा प्रभाव थोड्या प्रमाणात थंडीवर जाणवेल. तशीच स्थिती कोकण व पश्चिम महाराष्ट्रातही होईल. त्यामुळे थंडीची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होणे शक्य आहे.
अशा प्रकारच्या हवामानात उसात साखर निर्माण होण्यास हवामान अनुकूल राहील. गहू, करडई, हरभरा, जवस, मोहरी या पिकांच्या वाढीसाठी हे हवामान पोषक ठरेल. रब्बी कांदा व बटाटा पिकालाही या प्रकारचे हवामान मानवेल. तसेच रब्बी ज्वारीसाठी ते पोषक ठरेल. रब्बी हंगामातील पिकांचा उतारा चांगला येईल. आंबा मोहर निघण्यास हे हवामान उत्तम आहे.
प्रशांत महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १८ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव कमी होईल. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने बाष्पीभवनात वाढ होऊन ढगाळ हवामान राहील. या आठवड्यात सध्यातरी पावसासाठी हवामान अनुकूल नाही.
कोकण
कमाल तापमान रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६८ टक्के, तर रायगड जिल्ह्यात ५९ टक्के राहील.
पालघर व ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत वायव्येकडून, तर ठाणे जिल्ह्यात आग्नेयेकडून व पालघर जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. मात्र धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील.
नाशिक व जळगाव जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व जळगाव जिल्ह्यांत पूर्वेकडून, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६८ टक्के इतकी अधिक राहील. त्यामुळे सर्वच पिकावर सकाळी दवबिंदू जाणवतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात ५४ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० कि.मी. राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ५० टक्के, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४६ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत २८ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात २९ टक्के आणि अमरावती जिल्ह्यात ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात १८ कि.मी., तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ताशी १० ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याचा दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान सांगली, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. पुणे, अहिल्यानगर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के, तर अहिल्यानगर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात ५१ ते ५५ टक्के राहील. पुणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३० टक्के, तर सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत २७ ते २९ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात ५ कि.मी., पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी., अहिल्यानगर जिल्ह्यात ताशी ७ कि.मी. व सोलापूर जिल्ह्यात ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व पूर्व आणि ईशान्येकडून राहील.
कृषी सल्ला
पिकांना शक्यतो संध्याकाळी सिंचन करावे. त्यामुळे मातीचे तापमान संतुलित राहण्यास मदत होईल.
गहू व करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी.
आंबा मोहराचे संरक्षण करावे.
जनावरे व कुक्कुटपक्ष्यांचे थंडीपासून बचाव होण्यासाठी उपाय करावेत.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.