Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर वाढणार पावसाचा जोर

Rain Update : आजपासून (ता. २३) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधारेचा (रेड अलर्ट) असून, दक्षिण कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.
Weekly Weather Update
Weekly Weather Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय होऊ लागल्याने किनारपट्टीलगत ढगांची दाटी झाली आहे. कोकणात पावसाचा जोर वाढू लागला असून, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. आजपासून (ता. २३) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधारेचा (रेड अलर्ट) असून, दक्षिण कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर विदर्भातही पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. दिसून आले. रत्नागिरीतील मंडणगड येथे राज्यातील सर्वाधिक २०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली.

Weekly Weather Update
Monsoon Rain : माॅन्सूनने विदर्भ व्यापला; राज्यात पावसाला पोषक हवामान; विदर्भात पावसाचा अंदाज

शनिवारी (ता. २२) राज्यात ढगाळ हवामान होते. विदर्भासह मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली होती. पावसाची उघडीप असली तरी ऊन सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम होता. ढगाळ हवामान, पावसाच्या हजेरीने कमाल तापमान ३९ अंशांच्या खाली आहे. शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३८.७ अंश तापमानाची नोंद झाली.

Weekly Weather Update
Monsoon Rain : पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान; अनेक भागात पावसाची शक्यता

मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर आजपासून (ता. २३) पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट', रत्नागिरीसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :

रायगड : खालापूर ५५, महाड ६९, माणगाव ५६, म्हसळा ११०, पनवेल ५९, पेण ६०, पोलादपूर ७८, रोहा ९४, सुधागडपाली ११६, तळा १२४.

रत्नागिरी : चिपळूण १५७, दापोली ५५, खेड ९३, मंडणगड २०५, संगमेश्वर ७८, सावर्डे १४८, वाकवली १५०.

ठाणे : ठाणे ८३.

मध्य महाराष्ट्र :

कोल्हापूर : गगनबावडा ४५, शाहूवाडी ७४.

पुणे : लोणावळा २०.

सातारा : महाबळेश्वर ७२, पाटण २६.

मराठवाडा :

बीड : केज २२.

हिंगोली : हिंगोली २०, कळमनुरी २९.

जालना : घनसांगवी २९.

नांदेड : अर्धापूर ४९, भोकर ३०, हादगाव २८, हिमायतनगर ४८, किनवट २०, मुदखेड ३१.

परभणी : परभणी २०, पूर्णा २०, सोनपेठ २८,

विदर्भ :

गडचिरोली : धानोरा २५, गडचिरोली ५१, कोरची ३६, कुरखेडा २५, सिरोंचा २६.

गोंदिया : तिरोडा ४३.

यवतमाळ : दिग्रस ४७.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पुणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे :

मंडणगड २०५, चिपळूण १५७, वाकवली १५०, सावर्डे १४८. (जि. रत्नागिरी), तळा १२४, सुधागडपाली ११६, म्हसळा ११० (जि. रायगड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com