Monsoon Rain : माॅन्सूनने विदर्भ व्यापला; राज्यात पावसाला पोषक हवामान; विदर्भात पावसाचा अंदाज

Weather Update : माॅन्सूनने आजही राज्यासह देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली. तर राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : माॅन्सूनने आजही राज्यासह देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली. तर राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला. 

Weather Update
Monsoon Rain 2024 : जूनमध्ये पाऊस कमीच

माॅन्सूनने काल काही भागात प्रगती केली होती. त्यानंतरही आजही माॅन्सून काही भागात पुढे सरकला. माॅन्सूनने आज महाराष्ट्राच्या आणखी काही भागात प्रगती केली. माॅन्सूने आज संपूर्ण विदर्भ व्यापला. तर मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या आणखी भागात माॅन्सून दाखल झाला. माॅन्सूनची सिमा आज नवसारी, जळगाव, मांडला, पेंद्रा रोड, झारसुगुंडा, बालासोर, हलदीया, पाकूर, साहीबगंज आणि रौक्सोल भागात होती. 

Weather Update
Weather Update : विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्राचा उर्वरित भाग माॅन्सून व्यापेल. तसेच अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात माॅन्सून पोचेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने राज्याच्या अनेक भागात पुढील ४ दिवसांमध्ये पावसाचा अंदाज दिला. आजपासून कोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर उद्यापासून मराठवाड्यातील काही भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com