Maharashtra Rain: विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; मराठवड्यातही काही ठिकाणी अवकाळीची शक्यता

Rain Update : मागील दोन दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. तर नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली.
Weather Update
Weather UpdateAgrowon

Pune News : मागील दोन दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. तर नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.

Weather Update
Weekly Weather : बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, मुदखेड, उमरी, हदगाव, भोकर तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पावसादरम्यान अनेक भागात गारपीट झाल्याने रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले.

Weather Update
Weather Forecast : विदर्भात आजही वादळी पावसाचा इशारा कायम

तर यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात शनिवारी अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने १७ गावांना फटका बसला. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तूर तसेच संत्रा आदी अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच विदर्भातील अनेक भागात ढगाळ वातावरण होते.

हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला. मराठवड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आज हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला. तर विदर्भातील भंडारा, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com