Rain Forecast : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाच्या सरी सुरूच आहेत. बुधवारी (ता. २९) सायंकाळनंतर कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
Rain Forecast
Rain Forecast Agrowon

Pune News : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाच्या सरी सुरूच आहेत. बुधवारी (ता. २९) सायंकाळनंतर कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजा, मेधगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर केरळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हातकनंगले येथे ४० मिलीमीटर, तासगाव येथे ३०, तर सांगली आणि बारामती येथे प्रत्येकी २० मिलीमीटर, तर मराठवाड्यातील खुल्ताबाद येथे ३० आणि गंगापूर येथे २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Rain Forecast
Unseason Rain : वादळी पावसाने घेतले दोनशेवर जनावरांचे बळी

पावसाला पोषक स्थिती असल्याने आज (ता.१) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे.

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानातील घट, किमान तापमानातील वाढ कायम आहे. गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे उच्चांकी ३१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.३ (१८.६), धुळे २८.० (१७.५), जळगाव २६.४(१८.५), कोल्हापूर २९.६ (२१.७), महाबळेश्वर २५.६ (१६.८), नाशिक २८.५ (१७.७), निफाड २८.५ (१८.४), सांगली २९.८ (२०.९), सातारा २९.५ (१९.६), सोलापूर ३०.६(२२.०), सांताक्रूझ ३१.० (१९.७), डहाणू २८.९ (२०.०), रत्नागिरी ३३.० (२२.०),

Rain Forecast
Weather Forecast : नाशिक जिल्ह्यात गारपिटीचा इशारा ; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर २८.६ (२०.२), नांदेड २९.२ (२०.८), परभणी २८.० (२०.८), अकोला २५.५ (२०.५), अमरावती २६.४ (१९.४), बुलढाणा २६.४ (१९.४), ब्रह्मपूरी ३०.५ (१८.६), चंद्रपूर २९.०(१८.०), गडचिरोली ३०.२ (१५.४), गोंदिया २८.० (१७.२), नागपूर २७.२(१८.४), वर्धा २६.८(१९.२), वाशीम २४.२(१८.२), यवतमाळ २८.५ (१९.०).

उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्र

दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढली असून, गुरुवारी (ता. ३०) आग्नेय बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीचे रविवारपर्यंत (ता. ३) उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. सोमवारपर्यंत (ता. ४) उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यावर पोचण्याची शक्यता आहे.

जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट):

नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com