Rain Update : चार जिल्ह्यांत गारपीटचा इशारा; राज्यातील १८ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

Weather Update : राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर १८ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
 Rain Update
Rain Updateagrowon

IMD Alert : राज्यातील अनेक भागात आजही पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर १८ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 


हवामान विभागाने चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात जोरदार वाऱ्यांसह विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह गारपीट आणि पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

 Rain Update
Nagar Heavy Rain : नगर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. खानदेशातील नंदूरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यालाही येलो अलर्ट आहे.

याशिवाय संपूर्ण कोकण, कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात बहुतांशी भागात ढगाळ वातावरण राहू शकते. ठिकठिकाणी पावसाच्या सरीही पडू शकतात, असा अंदाज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com