Vidarbha Rain: विदर्भात ४ दिवस पावसाचा अंदाज; मराठवाड्यात उष्म आणि दमट हवामानाचा अंदाज

Rain Forecast: विदर्भातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज देण्यात आला.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on: 
Updated on: 

Pune News: विदर्भातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज देण्यात आला. तर दुसरीकडे ढगाळ हवामानामुळे तापमानात काहीशी घट दिसत असली तरी उन्हाचा कडाका मात्र कायम आहे. 

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला. तसेच यावेळी जोरदार वारेही वाहतील, असेही हवामानान विभागाने म्हटले आहे.

Rain Alert
Rain Alert Vidarbha : विदर्भात वादळी पावसाचा इशारा

तसेच अमरावती जिल्ह्यात आज आणि शुक्रवारी, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

Rain Alert
Weekly Weather: तापमानात वाढ; ढगाळ हवामानाची शक्यता

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ४ दिवस पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच तापमानातही वाढ होण्याचा अंदाज आहे.

हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. तर पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी हलक्या सरी पडतील. राज्यातील तापमानात काहीसे चढ उतारही दिसू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com